चौकशी समितीचा मुहूर्त 'बेपत्ता'
By Admin | Updated: June 2, 2016 02:28 IST2016-06-02T02:28:21+5:302016-06-02T02:28:21+5:30
पहेला प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत कर्मचाऱ्यांचे बयाण गोपनीयता भंगप्रकरणी चौकशी समितीचा मुहूर्त बेपत्ता आहे.

चौकशी समितीचा मुहूर्त 'बेपत्ता'
प्रकरण बयाण गोपनीयता भंगचे : जिल्हा आरोग्य अधिकारी रजेवर
भंडारा : पहेला प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत कर्मचाऱ्यांचे बयाण गोपनीयता भंगप्रकरणी चौकशी समितीचा मुहूर्त बेपत्ता आहे. समिती गठीत होऊन महिना लोटत असला तरी चौकशी थंडबस्त्यात आहे. त्यामुळे चौकशी समिती बड्या अधिकाऱ्यांप्रमाणे 'त्या' अधिकाऱ्यांवर 'मेहरबान' तर नाही ना, अशी खमंग चर्चा होत आहे.
पहेला येथील आरोग्य केंद्रातील कर्मचाऱ्यांचे गोपनीय बयान सार्वजनिक प्रकरणी आरोग्य सहाय्यिकेचे स्थानांतरण करण्यात आले. मात्र अद्यापही ज्या अधिकाऱ्यांकरवी बयाण गोपनियता भंगाची कारवाई व्हायला हवी ते पडद्याआड आहेत. त्यांना अधिकाऱ्यांकडूनच पाठबळ मिळत असल्याची चर्चा जिल्हा परिषद वर्तुळात आहे. 'लोकमत'च्या पाठपुराव्यानंतर प्रदीप बुराडे यांच्या अध्यक्षतेखाली चंद्रप्रकाश दुरुगकर, चंदूलाल पिल्लारे, खंडविकास अधिकारी मंजूषा ठवकर आणि तालुका आरोग्य अधिकारी अनुराधा जूगनाके यांची सदस्यीय चौकशी समितीत निवड करण्यात आली. या समितीला चौकशीसाठी १० मे रोजीचा मुहूर्त मिळाला. मात्र समिती १० ला आरोग्य केंद्रात पोहचली नाही. याविषयी जाणून घेण्याचा प्रयत्न केला असता काही अडचणी सांगण्यात आल्या. त्यानंतर आजपर्यत चौकशीसाठी समितीला मुहूर्तच सापडला नाही. चौकशीसाठी टाळाटाळ करण्यात येत असल्यामुळे 'अंधेर नगरी, चौपट राजा'प्रमाणे वास्तव असल्याचे समजते. (नगर प्रतिनिधी)