अड्याळ (भंडारा): अड्याळ पोलीस स्टेशन हद्दीतील एका रिसॉर्टमध्ये नेऊन अल्पवयीन मुलीवर अत्याचार झाल्याचा खळबळजनक प्रकार समोर आला आहे. पिडीत मुलीच्या तक्रारीवरून साजीद शेख (२१, रा. महीला समाज स्कूल मागे, भंडारा) याच्याविरूद्ध भारतीय न्याय संहिता कलम ६४ (२) (एम) सहकलम ४, ६ तसेच पोक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करून अटक करण्यात आली आहे.
४ एप्रिल रोजी रात्री ११:३० वाजताच्या सुमारास, पीडित मुलगी व शेख याची ओळख तीन वर्षांपूर्वी झाली. भंडाऱ्यातून दुचाकीवर बसवून रिसॉर्टवर नेले. तिथे तिच्या इच्छेविरुद्ध दोनदा अत्याचार केल्याची तक्रार पीडितेने केली आहे. पीडित व आरोपी हे अड्याळ हद्दीतील नसले तरी घटना हीच ठिकाणी घडल्याने गुन्हा नोंदवण्यात आला. तपास ठाणेदार धनंजय पाटील यांच्या मार्गदर्शनात पोलीस उपनिरीक्षक अनिल मांदाळे वरिष्ठांच्या मार्गदर्शनात करीत आहेत.
Web Summary : A minor girl was assaulted at a resort in Bhandara district. Police arrested Sajid Sheikh, 21, following the girl's complaint. He is charged under relevant sections of the Indian Penal Code and the POCSO Act. The incident occurred on April 4th.
Web Summary : भंडारा जिले के एक रिसॉर्ट में एक नाबालिग लड़की के साथ दुष्कर्म किया गया। पुलिस ने लड़की की शिकायत के बाद साजिद शेख, 21 को गिरफ्तार किया। उस पर भारतीय दंड संहिता और पोक्सो अधिनियम की संबंधित धाराओं के तहत आरोप लगाए गए हैं। घटना 4 अप्रैल को हुई।