तालुक्यातील ग्राम पंचायतींना किमान वेतनाचे वाटप

By Admin | Updated: February 28, 2015 00:50 IST2015-02-28T00:50:28+5:302015-02-28T00:50:28+5:30

तुमसर तालुक्यातील ग्रामपंचायतमध्ये कार्यरत कर्मचाऱ्यांचे किमान वेतनाचा अनुदान निधी वळता करताना तांत्रिक अडचणी आल्याने विलंब झाला असता.

Minimum Wage Allocation to Village Panchayats in Taluka | तालुक्यातील ग्राम पंचायतींना किमान वेतनाचे वाटप

तालुक्यातील ग्राम पंचायतींना किमान वेतनाचे वाटप

दणका लोकमतचा
चुल्हाड (सिहोरा) : तुमसर तालुक्यातील ग्रामपंचायतमध्ये कार्यरत कर्मचाऱ्यांचे किमान वेतनाचा अनुदान निधी वळता करताना तांत्रिक अडचणी आल्याने विलंब झाला असता. लोकमतने या संदर्भात वृत्त प्रकाशित केले. या वृत्ताची दखल घेत ९७ ग्रामपंचायतकडे १८ लाख रूपयाचा निधी वळता करण्यात आलेला आहे.
तुमसर तालुक्यातील ग्रामपंचायत मध्ये १५० हून अधिक कर्मचारी कार्यरत आहेत. या कर्मचाऱ्यांना राज्य शासन ५० टक्के आणि ग्रामपंचायत ५० टक्के किमान वेतन देत आहे. यात राहनीमान भत्ता आणि भविष्य निर्वाह निधी यांचा समावेश आहे. यामुळे कर्मचाऱ्यांना ७२०० रूपये असे महिन्याला किमान वेतन देण्यात येत आहे. गावात अल्पशा मानधनावर कर्मचारी १८ तास सेवा देत आहेत. ही सेवा देताना वेळ निश्चित नाही.
रात्री शासकीय आणि गैरशासकीय कार्यक्रमाचे आयोजन असताना हेच कर्मचारी अखेरपर्यंत सेवा देत आहेत. परंतु या कर्मचाऱ्यांना अतिरिक्त कामाचा मोबदला मिळत नाही.
गेल्या अनेक वर्षापासून हे कर्मचारी न्यायासाठी भांडत आहेत. परंतु कर्मचाऱ्यांचे वेतन आणि समस्याचे गाऱ्हाणे कुणी ऐकत नाही. राहणी भत्ता या कर्मचाऱ्यांना लागू करण्यात आलेला आहे. गावात वास्तव्य करित असताना हा भत्ता वेळेवर प्राप्त होत नाही. जे गावात वास्तव्य करित नाही, असे कर्मचारी बोगस राशीची उचल करित आहेत. यामुळे ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांना न्याय देताना शासकीय यंत्रणा हयगय करीत आहे.
दरम्यान सन २०१३-१४ या सत्राच्या कालावधीत ज्या ग्राम पंचायतीने ८० टक्के करांची वसुली तथा लोकवस्ती ० ते ५ हजार पर्यंत आहे, अशा गावांना १०० टक्के अनुदान राशी वाटपाचे निकष शासन स्तरावर लागू करण्यात आले असताना किमान वेतन वाटपाचे १८ लाख रूपये तुमसर पंचायत समितीला आॅक्टोंबर २०१४ ला वाटप झाले. परंतु तांत्रिक अडचणी आल्याने हा निधी ग्रामपंचायतकडे वळता करण्यात आलेला नाही. (वार्ताहर)

Web Title: Minimum Wage Allocation to Village Panchayats in Taluka

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.