मिनी ट्रक उलटला - २४ महिला मजूर जखमी
By Admin | Updated: November 25, 2014 22:49 IST2014-11-25T22:49:57+5:302014-11-25T22:49:57+5:30
धान कापणीकरिता महिला मजुरांना घेऊन जाणारा मिनी ट्रक उलटून झालेल्या अपघातात २४ महिला जखमी झाल्या. यातील तीन महिलांची प्रकृती चिंताजनक असून त्यांना भंडारा येथे हलविण्यात आले आहे.

मिनी ट्रक उलटला - २४ महिला मजूर जखमी
तुमसर : धान कापणीकरिता महिला मजुरांना घेऊन जाणारा मिनी ट्रक उलटून झालेल्या अपघातात २४ महिला जखमी झाल्या. यातील तीन महिलांची प्रकृती चिंताजनक असून त्यांना भंडारा येथे हलविण्यात आले आहे. २१ महिलांवर तुमसर उपजिल्हा सामान्य रुग्णालयात उपचार सुरु आहे. हा अपघात तुमसर-भंडारा मार्गावर खरबी शिवारात मंगळवारला सकाळी ९ वाजताच्या सुमारास घडला.
तुमसर तालुक्यातील खापा येथून मोहाडी तालुक्यातील चिचखेडा येथे ३० महिला मिनी ट्रक क्रमांक एम.एच. ३६ एफ १२५० ने जात होत्या. तुमसर भंडारा महामार्गावरील खरबी शिवारात दुसऱ्या वाहला ओव्हरटेक करताना मिनी ट्रकच्या चालकांचे नियंत्रण सुटल्यामुळे मिनी ट्रक रस्त्याच्या कडेला उलटला. यातील २४ महिला जखमी झाल्या. या अपघातात अश्विनी झाडे (३०), सविता ठवकर (२८), शिला मोहतुरे (३५), मंगला बोंदरे (३३), जयवंता माने (३३), पार्बता ढबाले (४५), सत्यशिला माने (३८), कविता कवरे (३५), ममता डोंगरे (३०), शिला ठवकर (३८), अनिता कोडवते (४२), वनिता ठवकर (४०), निर्मला तुमसर (४०), प्रभा बोंदरे (४२), भारती काळे (४०), गिरजा ठवकर (४५), संगीता ठवकर (३५), सुलभा हलमारे (६०), सुग्रता माने (५५), शिला हलमारे (४०), शिवकांता डोंगरे (४०), रा.खापा गंभीर जखमी असून त्यांच्यावर तुमसर रुग्णालयात उपचार सुरु आहेत.
गिरजा ठवकर (५५), उषा रामटेके (३०) व राधिका ठवकर (५०) या तीन महिलांची प्रकृती चिंताजनक आहे. त्यांना भंडारा जिल्हा सामान्य रुग्णालयात हलविण्यात आले. मोहाडी तालुक्यातील चिचखेडा, पिंपळगाव, कान्हळगाव, हरदोली परिसरात धान कापणीची मजुरी जास्त देण्यात येत असल्यामुळे परिसरातील गरीब महिला जीव धोक्यात घालून अशा वाहनातून येजा करीत आहेत. परंतु क्षमतेपेक्षा अधिक लोकांना वाहून नेत असतानाही वाहतूक पोलीस केवळ बघ्याची भूमिका घेत आहेत. अपघातानंतर चालक सेवक भोयर (३८) रा.खापा स्वत:च पोलिसांच्या स्वाधीन झाला. (तालुका प्रतिनिधी)