मिनी मंत्रालयाने आतापर्यंत अनुभवला १७ अध्यक्षांचा कारभार

By Admin | Updated: June 20, 2015 01:11 IST2015-06-20T01:11:54+5:302015-06-20T01:11:54+5:30

जिल्ह्याचे मिनी मंत्रालय असलेल्या जिल्हा परिषदेने आतापर्यंत १७ अध्यक्ष पाहिले आहेत.

Mini ministry has so far held 17 presidential offices | मिनी मंत्रालयाने आतापर्यंत अनुभवला १७ अध्यक्षांचा कारभार

मिनी मंत्रालयाने आतापर्यंत अनुभवला १७ अध्यक्षांचा कारभार

इंद्रपाल कटकवार भंडारा
जिल्ह्याचे मिनी मंत्रालय असलेल्या जिल्हा परिषदेने आतापर्यंत १७ अध्यक्ष पाहिले आहेत. महाराष्ट्र राज्याच्या निर्मितीपासून ते आजपर्यंतच्या अध्यक्षांचा यात समावेश आहे. विशेष म्हणजे भंडारा व गोंदिया जिल्हा वेगळा झाल्यावर आतापर्यंत जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदावर सात जणांना अध्यक्ष होण्याचा मान मिळाला आहे.
भंडारा जिल्हा परिषदेत एकूण ५२ सदस्य आहेत. यात सर्वात प्रथम अध्यक्ष होण्याचा मान के. डी. ठाकूर यांना मिळाला. सन १९६२ - १९७१ पर्यंत सलग ९ वर्ष अध्यक्षपदावर कायम होते.
यानंतर १६ आॅगस्ट १९७१ ते ११ आॅगस्ट १९७२ पर्यंत जी. एच. अग्रवाल अध्यक्ष बनले. १२ आॅगस्ट १९७२ ते २९ डिसेंबर १९७६ पर्यंत व्ही. सी. दुबे हे अध्यक्ष राहिले. १९ जानेवारी १९७७ ते १९ जून १९७९ पर्यंत बी. एल. पटले अध्यक्ष पदावर विराजमान होते. यानंतर राधेश्याम अग्रवाल हे २० जून १९७९ ते १८ फेब्रुवारी १९८७, बी. जे. नागभिरे हे १३ आॅगस्ट १९८७ ते ३० जून १९९०, टोलसिंग पवार हे २१ मार्च १९९२ ते २० मार्च १९९७, शिशुपाल पटले हे २१ मार्च १९९७ ते २० मार्च १९९८, श्रीमती किसनाबाई भानारकर हे २१ मार्च १९९८ ते २० मार्च १९९९, शिवलाल गावडकर हे २१ मार्च १९९९ ते ३० एप्रिल १९९९ हे अध्यक्षपदी होते. शिशुपाल पटले हे सन २००४ मध्ये खासदार झाले होते.
सन १९९९ मध्ये भंडारा जिल्ह्याचे विभाजन होऊन गोंदिया जिल्हा वेगळा झाला. त्यानंतर भंडारा जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदी विराजमान होण्याचा पहिला मान वामिना तरोणे यांना लाभला. त्या १५ जुलै २००० ते १४ जानेवारी २००३ पर्यंत अध्यक्ष होत्या. यानंतर चुन्नीलाल ठवकर हे १५ जानेवारी २००३ ते १४ जुलै २००५, मनोहर सिंगनजुडे हे १५ जुलै २००५ ते १४ जानेवारी २००८, सुमेध श्यामकुंवर हे १५ जानेवारी २००८ ते २२ जुलै २००९, राजकुमार मेश्राम हे १२ आॅगस्ट २००९ ते १४ जुलै २०१०, अ‍ॅड. वसंत एंचिलवार हे १५ जुलै २०१० ते १४ जानेवारी २०१३ त्यानंतर विद्यमान अध्यक्ष वंदना वंजारी या १५ जानेवारी २०१३ पासून कार्यरत आहेत.

Web Title: Mini ministry has so far held 17 presidential offices

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.