शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB चा 'विराट' विजय! प्ले ऑफच्या शर्यतीत इतरांच्या जीवावर उभे, पण PBKS ला बाहेर फेकले
2
वैजयंतीमाला, चिरंजीवी यांच्यासह १३२ विजेत्यांना राष्ट्रपतींच्या हस्ते पद्म पुरस्कार प्रदान
3
गंमत-जंमत केली तर खपवून घेणार नाही, मीच बंदोबस्त करेन; अजित पवारांनी दिला सज्जड दम
4
सेनेगलमध्ये ८५ प्रवाशांनी भरलेले विमान धावपट्टीवरून घसरले, लागली आग; मोठी दुर्घटना टळली!
5
रायली रुसोने फिफ्टी मारून बॅट उंचावली, विराट कोहलीने विकेट पडताच खोड काढली
6
भारतीय प्रवाशांनी भरलेलं विमान या देशानं माघारी पाठवलं! नेमकं काय घढलं? सरकारनं सांगितलं
7
जंगल सफारीला निघाला क्रिकेटचा देव! Sachin Tendulkar ने शेअर केले जिम कॉर्बेट नॅशनल पार्कमधील निसर्गरम्य Photos
8
मुंबईची लोकसभा निवडणूक आता भारत-पाकिस्तान लढाई झालेली आहे; भाजपाचे मविआवर टीकास्त्र
9
स्ट्राइक रेटवरून विराट कोहलीची अप्रत्यक्षपणे पुन्हा गावस्करांना कोपरखळी, म्हणाला...  
10
मतदान झालं, बारामतीत लीड कोणाला?; सुनेत्रा पवारांच्या विजयाबद्दल अजित पवार म्हणाले...
11
विराट कोहलीला शतकाची हुलकावणी, पण RCB ची आतषबाजी; PBKS समोर २४२ धावांचे लक्ष्य
12
यशाची गॅरंटी; 'पुष्य नक्षत्र' असेल PM मोदींसाठी खास, 'या' दिवशी उमेदवारी अर्ज भरणार...
13
शिवसेना नेते सुरेशदादा जैन यांचा उद्धवसेनेच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा
14
"खलिस्तानवर नियंत्रण ठेवण्याची गरज", ब्रिटनच्या NSA सोबत अजित डोवालांची चर्चा
15
ही निवडणूक राहुल गांधी vs नरेंद्र मोदी अन् जिहाद विरुद्ध...; अमित शाह यांचा मोठा हल्ला
16
PBKS vs RCB सामन्यात गारांचा पाऊस! सामना झालाच नाही तर कोण होईल 'गार'? चाहत्यांची वाढलीय चिंता
17
"अदानी, अंबानींची चौकशी करा; सत्य बाहेर येईल"; पंतप्रधान मोदींच्या टीकेवर काँग्रेसकडून पलटवार
18
धक्कादायक! चार दिवसांत दोन मातांनी गमावले प्राण, अहेरीत आरोग्यसेवेचा बोजवारा
19
तुफान राडा अन् लाथा-बुक्क्यांची जुगलबंदी! बसच्या दरवाज्यात दोन महिलांमध्ये तुंबळ हाणामारी (Video)
20
अब की बार, मतदान जोरदार!... कोल्हापुरातील वाढलेला टक्का कुणाला देणार धक्का? 

लाखांदुरात नवरदेवाची वरात निघाली दमणीतून

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 12, 2019 10:06 PM

प्रवासाची वेगवान साधने असलेल्या युगात दमनीतून काढलेली वरात सर्वांसाठी औत्सुक्याचा विषय आहे. वयाची पन्नासी पार केलेल्या अशा अनेक वराती अनुभवल्या असतील मात्र आधुनिक युगात लाखांदूरात एका शेतकरी पुत्राची वरात चक्क दमणीतून तेही वाजतगाजत काढण्यात आली.

ठळक मुद्देशेतीशी नाते घट्ट : दुर्मिळ वरात पाहण्यासाठी रस्त्याच्या दुतर्फा नागरिकांची गर्दी

दयाल भोवते ।लोकमत न्यूज नेटवर्कलाखांदुर : प्रवासाची वेगवान साधने असलेल्या युगात दमनीतून काढलेली वरात सर्वांसाठी औत्सुक्याचा विषय आहे. वयाची पन्नासी पार केलेल्या अशा अनेक वराती अनुभवल्या असतील मात्र आधुनिक युगात लाखांदूरात एका शेतकरी पुत्राची वरात चक्क दमणीतून तेही वाजतगाजत काढण्यात आली. जुन्या काळातील वरातीचा आनंद नवीन पिढीलाही लुटता आला.अलीकडे गावागावांत प्रवासाची साधने वाढली आहे. विविध आलीशान वाहनातून वराती काढल्या जातात. घोड्यावर बसून नवरदेव मंडपापर्यंत पोहोचतो, काही ठिकाणी हौशी नवरदेव मोटारसायकल व इतर वाहनाचाही वापर करतात. परंतु लाखादूर येथील कुथे कुटुंबातील नवरदेव चक्क दमनीत बसून आला. रंगीबेरंगी झुली पांघरलेले बैल दमनीला जुंपण्यात आले होते. बैलांच्या गळ्यात घुगर माळा, पायात चाळ आणि दमनीच्या चाकाना घुंगरे बांधण्यात आली होती. येथील टी-पॉर्इंटवरुन वाजत गाजत ही वरात लग्नमंडपापर्यंत काढण्यात आली. तेव्हा रस्त्याच्या दोन्ही बाजूला हा सोहळा पाहण्यासाठी गर्दी झाली होती. कुथे परिवाराचे शेती आणि बैलांशी नाते कायम आहे. त्यामुळेच त्यांनी पर्यावरण पुरक अशा दमनीचा वापर करुन नवरदेवाची वरात काढली.ग्रामीण संस्कृतीशी नाळ जोडणाऱ्या या दमनीची वरात तरुणांईने अनुभवली. अनेकजण या दमनीच्या मागेपुढे धावत होते. तर काहीजण परंपरागत वाद्यावर नृत्य करीत होते. लाखांदूर परिसरात आता कुथे परिवाराच्या या आगळावेगळ्या वरातीची चर्चा असून नव्या पिढीला या वरातीमुळे जुन्या काळातील दमनीचे दर्शन झाले. 

टॅग्स :marriageलग्न