दुग्ध उत्पादकांनी पशुसंतुलित आहारातून प्रगती साधावी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 26, 2017 22:17 IST2017-12-26T22:17:18+5:302017-12-26T22:17:49+5:30
शेती व्यवसायासोबत दुग्ध व्यवसाय करुन शेतकऱ्यांनी आर्थिक प्रगती करावी यासाठी पशु संतुलन पोषण आहार या राष्ट्रीय डेअरी विकास बोर्डाच्या माध्यमातून दुध उत्पादकांना आर्थिक मदत पुरविली जाते.

दुग्ध उत्पादकांनी पशुसंतुलित आहारातून प्रगती साधावी
आॅनलाईन लोकमत
भंडारा : शेती व्यवसायासोबत दुग्ध व्यवसाय करुन शेतकऱ्यांनी आर्थिक प्रगती करावी यासाठी पशु संतुलन पोषण आहार या राष्ट्रीय डेअरी विकास बोर्डाच्या माध्यमातून दुध उत्पादकांना आर्थिक मदत पुरविली जाते. याचा लाभ शेतकऱ्यांनी घ्यावा, असे प्रतिपादन भंडारा जिल्हा दुग्ध उत्पादक सहकारी संघाचे जिल्हाध्यक्ष रामलाल चौधरी यांनी केले.
भंडारा जिल्हा दुग्ध उत्पादक सहकारी संघ व राष्ट्रीय डेअरी विकास बोर्ड यांच्या माध्यमातून आमगाव येथील राजस्वी महिला दुग्ध उत्पादक सहकारी संस्थेच्यावतीने आयोजित दुग्ध उत्पादक शेतकऱ्यांच्या सभेत ते बोलत होते.
यावेळी जिल्हा दुग्ध संघाचे कार्यकारी संचालक करण रामटेके, दुग्ध संकलन अधिकारी टी. एल. बुलबुले, माजी सरपंच सुनिता चौधरी, माजी सरपचं हेमराज बोंदरे, ग्रा.पं. सदस्य शुभांगी बडवाईक, तंटामुक्त समिती अध्यक्ष सचिन भगत, भगवान गायधने आदी उपस्थित होते.
यावेळी चौधरी यांनी राष्ट्रीयय डेअरी विकास बोर्डाच्या पशु संतुलन पोषण आहाराची माहिती सांगितली. दुग्ध उत्पादकांनी पोषण आहारासह जनावरांचे निरोगी संगोपण व त्यांच्या दुध उत्पादन वाढीसाठी दुग्ध उत्पादक संघाची मदत घ्यावी व त्यासाठी संघ सर्वोतोपरी मदत करणार असल्याची ग्वाही दिली.
यावेळी करण रामटेके यांनी पशु संतुलीत आहार पोषण कार्यक्रम भंडारा जिल्ह्यात गावस्तरावर राबवून जिल्ह्यात धवलक्रांती करण्याचे आवाहन केले. संचालन पशुसंतूलीत पोषण आहार प्रशिक्षक ललित चामट यांनी तर आभारप्रदर्शन अनुज नेवल यांनी केले. यावेळी आमगाव येथील दुध उत्पादक शेतकऱ्यांची उपस्थिती होती.