दुधाचे दर दोन रुपयांनी घसरले

By Admin | Updated: July 16, 2015 00:56 IST2015-07-16T00:56:37+5:302015-07-16T00:56:37+5:30

शेतीला पूरक व जोडधंदा म्हणून दूध व्यवसायाला शेतकऱ्यांनी पसंती देत धवलक्रांती घडवली.

Milk fell by two rupees | दुधाचे दर दोन रुपयांनी घसरले

दुधाचे दर दोन रुपयांनी घसरले

पालांदूर : शेतीला पूरक व जोडधंदा म्हणून दूध व्यवसायाला शेतकऱ्यांनी पसंती देत धवलक्रांती घडवली. जीव ओतून संपूर्ण कुटुंब पशुपालनात गुंतून दुग्ध व्यवसाय पुढे आणून जनतेची पर्यायाने शासनाची दुधाची गरज पूर्ण केली. मात्र शासन शेतकऱ्याच्या जीवावर उठल्याने मागे चार महिन्यापूर्वी व आता दोन दोन रुपये म्हणजे प्रती लिटरला चार रुपये कमी केले.
यामुळे दुग्ध उत्पादकात नाराजी पसरली असून मोदीचे शासन शेतकरी विरोधी असून उद्योजकांचे भले करणारी असल्याची प्रतिक्रिया शेतकरी देत आहे. दूध व्यवसायाला चालना मिळण्याकरिता जिल्ह्यात संघ तयार होऊन गावागावात डेअरी उघडण्यात आल्या. गावातले दूध गावातच विकून शेतकरी समृद्ध झाला. मात्र युती शासनाने वक्रदृष्टी फिरवत शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले आहे. उच्च दर्जाच्या दुधालासुद्धा अधिक भाव न देता नियमित दर्जाच्याच भावाने दूध खरेदी होत असल्याची प्रतिक्रिया देऊन संचालक पांडुरंग खंडाईत यांनी लोकमतला सांगितले.
पशुखाद्य अर्थात खुराक ज्याच्या कुकुस, ढेप, सरकी आदींचे दर वाढतच चालले असताना यांच्यावर हीच नाही. गरजवंत शेतकरी नाईलाजाने खरेदी करतोच, हे न्यायनितीला धरून नाही. राजकीय नेते याविषयात ब्र शब्द काढायला तयार नसल्याने सत्ताधारी नाराजी आहे.
भंडारा - गोंदिया जिल्ह्यात जिल्हा परिषद व पंचायत समिती निकालात बदल ही शेतकरी विरोधी धोरणाची प्रचितीच असल्याचे बोलले जात आहे. (वार्ताहर)

Web Title: Milk fell by two rupees

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.