शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
7
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
8
बेकरीत काम करणाऱ्या २५ वर्षीय तरुणाची आत्महत्या, ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
9
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
10
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
11
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
12
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
13
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
14
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
15
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
16
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
17
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
18
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
19
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
20
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!

विविध तलावांवर स्थलांतरित पाणपक्षी गणना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 18, 2018 21:51 IST

अशी पाखरे येते आणिक स्मृती सोडून जाती, दोन दिसांची रंगत संगत दोन दिसांची नाती असे सुंदर भावगीत लिहिणाऱ्या ग.दि. माडगुळकरांच्या काव्यांची प्रचिती ग्रीनफ्रेन्डस् नेचर क्लबच्या भंडारा- गोंदिया जिल्ह्यातील मागील १८ वर्षापासून सातत्याने घेतल्या जाणाऱ्या विविध तलावांवरच्या स्थलांतरीत पाणपक्षी गणनेमध्ये यावर्षी सुद्धा प्रचिती आली.

ठळक मुद्देदुर्मिळ कलहंस बदक आढळले : ग्रीन फ्रेन्ड्सचा उपक्रम

आॅनलाईन लोकमतलाखनी : अशी पाखरे येते आणिक स्मृती सोडून जाती, दोन दिसांची रंगत संगत दोन दिसांची नाती असे सुंदर भावगीत लिहिणाऱ्या ग.दि. माडगुळकरांच्या काव्यांची प्रचिती ग्रीनफ्रेन्डस् नेचर क्लबच्या भंडारा- गोंदिया जिल्ह्यातील मागील १८ वर्षापासून सातत्याने घेतल्या जाणाऱ्या विविध तलावांवरच्या स्थलांतरीत पाणपक्षी गणनेमध्ये यावर्षी सुद्धा प्रचिती आली.ग्रीन फ्रेन्डस् नेचर क्लबतर्फे जानेवारी फेब्रुवारी महिन्यात भंडारा जिल्ह्यातील रेंगेपार कोहळी, सोमनाथ, बरडकिन्ही, रावणवाडी, कोकणागड, खुर्सीपार बांध, न्याहारवानी, गुढरी, शिवणीबांध, सिरगावबांध, चिचटोला, वलमाझरी, एकोडी, गडकुंभली, सेंदुरवाफा, साकोली, भिमलकसा, उसगाव, चांदोरी, पिंपळगाव, लाखनी, भूगाव मेंढा तसेच गोंदिया जिल्ह्यातील नवेगावबांध, कोहलगाव, सौंदड, सडक अर्जुनी, अर्जुनी मोरगाव, बोदलकसा, चोरखमारा, जांभळी, येनोडी, बोंडगाव , सुरबन, इटियाडोह, भिवखिडकी, मुगली तलावावर स्थलांतरीत पक्षीगणना करण्यात आली. उन्हाळ्याची चाहुल लागल्याने स्थलांतरीत बदके जी सैबेरिया, मंगोलिया, लडाख, काश्मिर, चीन, युरोप, अफगाणिस्तान, इराक, इराण भागातून आलेली ही बदके आता परतीच्या मार्गाच्या वाटेवर लागली आहेत. त्यांच्या निरीक्षणामध्ये यावेळी दुष्काळामुळे तलावात पाणी कमी असल्याने काही चांगल्या तलावावर पक्ष्यांनी पाठ फिरविली तर काही जंगल तलावात व गाव तलावामध्ये पाण्याचा पुरेपुर साठा असल्याने तिथे भरपूर पाणपक्षी आढळले. थंडीचे प्रमाण डिसेंबर शेवट व जानेवारी महिन्यात टिकून राहिल्याने पाणपक्ष्यांची विविधता फेब्रुवारी पर्यंत टिकून राहिली असे सुद्धा प्रा.गायधने यांनी सांगितले.यावर्षी दुर्मिळ कलहंस बदक भरपूर प्रमाणात काही तलावावर दिसली असली तरी मागील तीन वर्षापासून दिसणारे राजहंस बदकांनी यावर्षी भंडारा गोंदिया जिल्ह्यात पाठ फिरविली असे त्यांना निरीक्षणात आढळले. पाणबदकामध्ये मोठा स्वरल, चक्रवाक, नकटा गडवाल, तरंग, प्लवा, अटला, चक्रांग, भुवई, तलवार, मोठी लालसरी, शेंडीबदक, कलहंस, बदक, जांभळी, पाणकोंबडी, विविध पाणतलाव , तुरवार, मालगुजा, कमळपक्षी, सोनपुंखी, कमळपक्षी, शेकाट्या, रंगीत, करकोचा, चिलखा, टिटवी, पाणकावळे, चांदीबदक, तिरंदाज, उघडचोच, करकोचा, काळा व पांढरा शराटी, युरिेशिनय चमचाचोच, करकोचा, खंड्या, कबड्या ढिवर, छोटा खंड्या, तसेच विविध प्रकारचे बगडे, व ढोकरी इत्यादी स्थलांतरीत व स्थानिक पाणपक्षी आढळले. स्थलांतरीत पाणपक्षी गणनेचा अहवाल बी.एन.एच.एस. मुंबई व महाराष्ट्र पक्षीमित्र संघटनेकडे पाठविण्यात आला. हिवाळी पाणपक्षी गणनेला ग्रीनफ्रेन्डस्चे पदाधिकारी ओशक वैद्य, दिलीप भैसारे, दिनकर कालेजवार, आकाश कोडापे व रतन कोडापे, रामपुरी यांनी सहकार्य केले.