उत्सवातून समानतेचा संदेश
By Admin | Updated: November 7, 2015 00:26 IST2015-11-07T00:26:53+5:302015-11-07T00:26:53+5:30
भारतीय संस्कूती विविधतेन ेनटली आहे. सर्वधर्मसमभाव हा लोकशाहीचा अंत्यत पोषक अलंकार भारत देशाने नेहमी कायम राखला आहे.

उत्सवातून समानतेचा संदेश
नाना पटोले : सद्भावना शारदा मंडळाचा उपक्रम
भंडारा : भारतीय संस्कूती विविधतेन ेनटली आहे. सर्वधर्मसमभाव हा लोकशाहीचा अंत्यत पोषक अलंकार भारत देशाने नेहमी कायम राखला आहे. उत्सवातून धर्म व भावनेची सांगड घालुन एकतेचा संदेश देणारे कार्यक्रमही होत असतात. असाच उपक्रम भंडाऱ्यातील सदभावना शारदा मंडळाने जोपासून जनमानसात हिंदु-मुस्लिम एकतेचा संदेश दिला आहे, असे प्रतिपादन खासदार नाना पटोले यांनी केले.
शहरातील हनुमान वॉर्डात सदभावना शारदा उत्सव मंडळातर्फे मगागील दहा दिवसात शारदा उत्सवाच्या निमित्ताने विविध स्पर्धा घेण्यात आली. यात आज शुक्रवारी नृत्य स्पर्धा व महाप्रसादाने उत्सवाची सांगता करण्यात आली. यावेळी अतिथी म्हणून खासदार नाना पटोले, नगरसेवक विकास मदनकर, मंडळाचे अध्यक्ष कमल देसाई, उपाध्यक्ष नितीन दुरगकर, राजू देसाई, संदीप निंबार्ते आदी उपस्थित होते.
उत्सवासाठी अक्षय मेश्राम, दिनेश नागदेवे, सोहेल शेख, सौरभ देसाई, विक्रम चौधरी, कार्तिक मेश्राम, अंशु तिरपुडे, पुनीत देसाई, धनंजय धुर्वे व अन्य कार्यकर्त्यांनी सहकार्य केले. (प्रतिनिधी)