पारा ४४ अंशावर उकाड्याने जनजीवन प्रभावित
By Admin | Updated: April 17, 2016 00:23 IST2016-04-17T00:23:05+5:302016-04-17T00:23:05+5:30
एप्रिल महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात उन्हाचा तडाखा वाढला आहे. शहराचे तापमान ४४ अंशावर पोहचले आहे.

पारा ४४ अंशावर उकाड्याने जनजीवन प्रभावित
भंडारा : एप्रिल महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात उन्हाचा तडाखा वाढला आहे. शहराचे तापमान ४४ अंशावर पोहचले आहे. दुपारी रस्त्यांवर शुकशुकाट जाणवत आहे. आजारी रूग्ण, कामानिमित्त बाहेर पडणाऱ्या नागरिकांसह चिमुकल्यांना उकाड्याचा त्रास सहन करावा लागत आहे. मे महिन्यामध्ये तापमानात आणखी वाढ होण्याची शक्यता आहे. सूर्याचे उत्तरायण सुरू झाल्यापासून तापमानात वाढ होत जाते. फेब्रुवारीनंतर खऱ्या अर्थाने उन्हाचे चटके बसण्यास सुरूवात होते. मात्र २०१३ पासून हवामानात अनपेक्षित बदल होऊन जानेवारी ते एप्रिलपर्यंत वादळी वारा, अवकाळी पाऊस आणि गारपीट होत आहे. त्यामुळे तापमानात खंड पडून दमट वातावरण जास्त राहिले आहे. उन्हाचा चटका कायम असल्यामुळे त्याचा फटका बसत आहे. परंतु, आता तापमान वाढले तरच मान्सुन वेळेवर येईल, असे हवामानतज्ज्ञांचे म्हणणे आहे. दरम्यान, उन्हामुळे बच्चे कंपनी चांगली त्रस्त असून त्यांना खेळण्यासाठी सकाळ व संध्याकाळ हीच वेळ मिळत आहे. (नगर प्रतिनिधी)