पारा ४१.५ अंशावर

By Admin | Updated: March 26, 2017 00:20 IST2017-03-26T00:20:24+5:302017-03-26T00:20:24+5:30

वातावरणातील गारवा कमी होताच उन्हाचा तडाखा सुरु झाला असून मार्च महिन्याच्या मध्यवर्ती उन्हाचा जोर वाढला आहे.

Mercury at 41.5 degrees | पारा ४१.५ अंशावर

पारा ४१.५ अंशावर

उन्हाची दाहकता : रस्त्यावर सामसूम
देवानंद नंदेशवर भंडारा
वातावरणातील गारवा कमी होताच उन्हाचा तडाखा सुरु झाला असून मार्च महिन्याच्या मध्यवर्ती उन्हाचा जोर वाढला आहे. गेल्या काही दिवसांपासून जिल्ह्यातील तापमानात वाढ झाली आहे. पारा ४१.५ अंश सेल्सिअसपर्यंत पोहचला आहे. त्यामुळे वातावरणात मोठा उष्मा वाढला आहे. दर वर्षी उन्हाची दाहकता वाढत असते. यंदा मात्र दरवर्षीच्या तुलनेत सूर्य जास्तच तापत असल्याने मार्च महिना संपण्याअगोदरच अंगाची लाही लाही होऊ लागली आहे,
वाढत्या उन्हामुळे बाजारपेठ, शेतीतील कामे, नागरिकांचे फिरणे या दैनंदिन कामावर परिणाम झाला आहे, वाढत्या उन्हापासून संरक्षण करण्यासाठी वापरल्या जाणारे टोपी,सनकोटची खरेदी वाढली आहे. नागरिकांनी उन्हापासून बचाव करण्यासाठी प्रयत्न सुरु केले आहे. शीतपेयाची दुकाने गजबजू लागली आहे, थंड पाणी आणि उसाचा रस, कोल्ड्रींग्स, आईस्क्रीम यांची मागणी वाढली आहे. जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यातील मुख्य रस्त्यावर रसवंती गृह भर दुपारी गजबजू लागली आहे, रसवंती गृहाच्या ठिकाणी बांधलेल्या घुंगरांचा मंजुळ आवाज परिसरात वातावरण निर्मिती करत आहे. आणि हा मंजुळ आवाज वाटसरूंना उसाच्या रसाची आठवण करून देत आहे.
एकंदरीतच वाढत्या उन्हाने माणसाच्या दैनंदिन जीवनावर परिणाम झाला असून वेगवेगळ्या मागार्चा अवलंब करून उन्हापासून बचाव करण्यासाठी परिसरात प्रयत्न सुरु झाल्याचे चित्र दिसत आहे. २४ मार्च रोजी पारा ४१ अंश सेल्सीअस नोंदविण्यात आले.
आज २५ रोजी कमाल तापमान ४१.५ व किमान तापमान २८ अंश सेल्सीअस नोंदविण्यात आली. मार्च महिन्याच्या तीसऱ्या आठवड्यापासून उष्णतेत वाढ झाली असून येत्या एप्रिल व मे महिन्यामध्ये ही वाढ अधिक होण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तविली आहे.

Web Title: Mercury at 41.5 degrees