जिल्हा रूग्णालयात मानसिक आरोग्य सप्ताह

By Admin | Updated: October 16, 2015 01:14 IST2015-10-16T01:14:27+5:302015-10-16T01:14:27+5:30

जगभर १० आॅक्टोंबर रोजी जागतिक मानसिक आरोग्य दिवस साजरा करण्यात येतो. या निमित्त जिल्हयात ...

Mental Health Week in District Hospital | जिल्हा रूग्णालयात मानसिक आरोग्य सप्ताह

जिल्हा रूग्णालयात मानसिक आरोग्य सप्ताह


भंडारा : जगभर १० आॅक्टोंबर रोजी जागतिक मानसिक आरोग्य दिवस साजरा करण्यात येतो. या निमित्त जिल्हयात १७ आॅक्टोंबरपर्यंत मानसिक आरोग्य जनजागरण सप्ताह म्हणून साजरा करण्यात येत आहे. या सप्ताहांतर्गत सामान्य रुग्णालय येथे रॅलीचे आयोजन करण्यात आले होते.
या रॅलीचा शुभारंभ जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. देवेंद्र पातुरकर यांनी हिरवी झेंडी दाखवुन केला. यावेळी अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. सुनिता बढे, शल्य चिकित्सक पियुष जक्कल डॉ. टेंभुर्णे, मनोरोग तज्ञ सुदर्शन हरले उपस्थित होते. रॅली जिल्हा सामान्य रुग्णालय येथून बसस्थानक मार्गे शहराचे मुख्य बाजारपेठ, पोस्ट आॅफीस येथून निघून सामान्य रुग्णालय येथे समारोप झाला.
यावेळी मानसिकआरोग्य जनजागरण घोष्यवाक्य व घोषणा देण्यात आल्या.
रॅलीसाठी मानसिक विभागाचे मनोविकृती तज्ज्ञ, अधिसेविका रंजना नंदनवार प्रशिक्षण महाविद्यालयाच्या परिचारीका मोनाली नाहर, सावित्रीबाई फुले नर्सिंग स्कुलच्या घनमाला परिचारीका सुलभा राखडे, सतीश भगत, संतोष धनुरे, मनिष भारसाखरे, माधूरी साखरवाडे, ज्योती हटवार, कृपाल यांनी विशेष परिश्रम घेतले.
या रॅलीत शासकीय परिचारीका प्रशिक्षण महाविद्यालय, आठवले समाजकार्य महाविद्यालय, सावित्रीबाई फुले नर्सिंग स्कुल येथील विद्यार्थीनी, रुग्णालयाचे अधिकारी कर्मचारी व परिचारीका सहभागी झाल्या होत्या. (प्रतिनिधी)

Web Title: Mental Health Week in District Hospital

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.