बावनथडीतील पाणीवाटपासाठी बैठक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 12, 2017 23:25 IST2017-08-12T23:25:17+5:302017-08-12T23:25:47+5:30
तुमसर व मोहाडी तालुक्यातील पावसाअभावी रोवणी खोळंबली असल्याने याची दखल घेऊन ....

बावनथडीतील पाणीवाटपासाठी बैठक
लोकमत न्यूज नेटवर्क
भंडारा : तुमसर व मोहाडी तालुक्यातील पावसाअभावी रोवणी खोळंबली असल्याने याची दखल घेऊन आमदार चरण वाघमारे यांनी तुमसर येथील जनसंपर्क कार्यालयात बावनथडी प्रकल्पाचे विविध अधिकाºयांना बोलावून पाणी वाटपासंबंधी आढावा बैठक घेतली.
बावनथडी प्रकल्पाचे पाणी आ. वाघमारे यांच्या प्रयत्नाने सोडण्यात आल्याने तुमसर व मोहाडी तालुक्यात रोवणीला सुरूवात झालेली आहे. मागील १५ दिवसांपासून पाऊस न पडल्याने दुष्काळजन्य परिस्थिती निर्माण झाली आहे. पाण्याअभावी रोवणी खोळंबल्या असून पºहे करपू लागली आहे. शेतकºयांनी कर्ज काढून धानाची बिजाई खरेदी केली होती. परंतु पावसाने दगा दिल्याने रोवणी कशी करावी, या विवंचनेत बळीराजा अडकला.
याची दखल घेत आमदार चरण वाघमारे यांनी बावनथडी प्रकल्पाच्या वरिष्ठ अधिकाºयांना बोलून पाणी सोडण्यासाठी प्रयत्न केले. याला अधिकाºयांनी दाद देवून बावनथडी प्रकल्पाचे पाणी सोडले. बावनथडी प्रकल्पाच्या पाण्याने रोवणी होणार असल्याने शेतकºयांनी आमदार चरण वाघमारे यांचे आभार मानले आहे.
तुमसर येथील जनसंपर्क कार्यालयात आयोजित आढावा बैठकीला उपविभागीय अभियंता रामटेके, कार्यकारी अभियंता चोपडे, तुमसरचे तहसीलदार बालपांडे व बावनथडी प्रकल्पाचे शाखा अभियंता, यांच्यासह कर्मचारी व मोठ्या प्रमाणात परिसरातील शेतकरी उपस्थित होते.