शॉर्ट सर्किटमुळे मेडिकल दुकान जळून खाक
By Admin | Updated: July 27, 2015 00:47 IST2015-07-27T00:47:35+5:302015-07-27T00:47:35+5:30
शहरातील कारगिल चौकामध्ये असलेल्या मानसी मेडिकल स्टोर्समध्ये शुक्रवारी मध्यरात्री शॉर्टसर्कीटमुळे आग लागल्याने संपूर्ण दुकान जळून राख झाले.

शॉर्ट सर्किटमुळे मेडिकल दुकान जळून खाक
१२ लाख रुपयांचे नुकसान : गस्तीमुळे आगीची माहिती
देवरी : शहरातील कारगिल चौकामध्ये असलेल्या मानसी मेडिकल स्टोर्समध्ये शुक्रवारी मध्यरात्री शॉर्टसर्कीटमुळे आग लागल्याने संपूर्ण दुकान जळून राख झाले.
प्राप्त माहितीनुसार, शुक्रवारला रात्री दुर्गा चौकाकडून कारगिल चौकाकडे येताना रात्री गस्ती दरम्यान पोलिसांना मानसी मेडीकल मधून धूर निघताना दिसला. आग लागली असल्याचे कळताच त्यांनी दुकानामागे राहणारे बब्बु सलूजा व दुकानमालक नरेंद्र नास्तीक तांडेकर याला घरुन बोलावून आणले. कुलूप उघडून आग विझविण्यात आली. तोपर्यंत तेथील फ्रीज, टिव्ही, कम्प्युटर, फर्निचर तसेच लाखो रुपये किमतीचे औषध व गोळ्या जळून राख झाल्या होत्या. दुकान मालक नरेंद्र तांडेकर मागील तीन वर्षापासून मेडीकल स्टोर्स चालवित असून त्यांनी नुकतेच एका बँकेतून तीन लाख रुपयांचे कर्ज घेतले होते व दुकानात औषधांचा संपूर्ण साठा उपलब्ध केला होता. त्याच्या म्हणण्यानुसार १२ लाख रुपयांचे नुकसान या आगीमुळे झाले आहे. जर रात्रीच्या वेळी पोलिसांना गश्ती दरम्यान ही आग दिसली नसती तर या दुकानाच्या आगीमुळे इतरत्र घरांना सुद्धा आग लागली असती व मोठी जीवित हानी टाळता आली नसती. पोलिसांच्या रात्रीच्या सहकार्याबद्दल गावकऱ्यांनी त्यांचे कौतुक केले आहे. (प्रतिनिधी)