पोलिसांच्या कलमा माझ्यासाठी मेडल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 3, 2016 00:41 IST2016-05-03T00:41:16+5:302016-05-03T00:41:16+5:30

पोलिसांनी कोणाच्याही दबावात येऊ नये. त्यांनी निपक्षपणे कर्तव्य बजवावे. ठाणेदारांनी सिंघमची भूमिका बजवावी.

Medal for the Police Section | पोलिसांच्या कलमा माझ्यासाठी मेडल

पोलिसांच्या कलमा माझ्यासाठी मेडल

शांतता सभा : राजेंद्र पटले यांचे प्रतिपादन
मोहाडी : पोलिसांनी कोणाच्याही दबावात येऊ नये. त्यांनी निपक्षपणे कर्तव्य बजवावे. ठाणेदारांनी सिंघमची भूमिका बजवावी. मी न्यायाच्या व सत्याच्या नेहमी पाठीशी राहत आलो आहे. शेतकरी, मजूर, युवकांच्या भल्यासाठी अनेक मार्चे, आंदोलन केले आहे. त्या वेगवेगळ्या आंदोलनात माझ्यावर पोलिसांनी कलमा लावल्या त्या कलमा मी माझ्यासाठी मेडलच समजतो, अशी गर्जनायुक्त प्रतिपादन शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र पटले यांनी केले.
कान्हळगाव (सिरसोली) येथे रोजगार हमी योजनेच्या कामावर एका तरूणीला मारहाण झाली. त्या प्रकरणी पोलिसांनी अदखलपात्र गुन्ह्याची नोंद रजिस्टर करून आरोपीला सोडून दिले. आरोपीला अटक करावी, तरूणीचे बयान पुन्हा महिला पोलिसांकडून नोंदविण्यात यावे, आदी मागण्यांसाठी कान्हळगाव, सिरसोली येथील ग्रामपंचायतच्या प्रांगणात आंदोलनाची भूमिका निश्चित करण्यासाठी शांतता सभेचे आयोजन करण्यात आले होते. त्या सभेत जनतेला संबोधित करताना शिवसेना जिल्हाध्यक्ष राजेंद्र पटले बोलत होते.
शांतता सभेच्या अध्यक्षस्थानी सरपंच मेघा उटाणे होत्या. मंचावर उपसरपंच राजू उपरकर, आंधळगावचे ठाणेदार मनोज काळबांधे, ग्रामपंचायत सदस्य चंद्रशेखर कस्तुरे, सतीश ईटनकर, रक्षा बागडे, राजकुमार बांते, प्रा. डॉ. सुनिल चवळे, सिनेट सदस्य नितेश फुलेकर यांची उपस्थिती होती. पुढे बोलताना, राजेंद्र पटले म्हणाले, काही पक्षाच्या नेत्यांनी प्रकरण दडपण्याचा प्रयत्न केला. त्यांचा त्यांनी जाहीर निषेध केला. या प्रकरणात तरूणीला न्याय मिळालानाही तर मी कान्हळगावासीच्या लोकांसोबत राहून ५ मे च्या मोर्च्याचे नेतृत्व करणार आहे तसेच पोलिसांनी चोवीस तासाच्या आत आरोपीला अटक करावी असा इशारा पोलिस प्रशासनाला दिला आहे.
यावेळी आंधळगावचे ठाणेदार यांनी मोर्चा काढण्याची वेळे जनतेवर येणार नाही. आरोपीला तात्काळ अटक करण्यात येईल. गावकऱ्यांनी एका तरूणीच्या अन्यायाबाबत एकजुटता दाखविली. याचे मला कौतूक करावेसे वाटत तसेच यावेळी प्रा. डॉ. सुनील यवळे, माजी सरपंच अनुप उटाणे, नितेश फुलेकर, राजकुमार बांते यांनीही नागरिकांना मार्गदर्शन केले. सभेचे संचालन राजू उपरकर, आभार मेघा उटाणे यांनी मानले. (तालुका प्रतिनिधी)

Web Title: Medal for the Police Section

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.