नैसर्गिक आपत्तीचा सामना करण्यासाठी यंत्रणा सज्ज ठेवावी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 5, 2021 04:25 IST2021-06-05T04:25:39+5:302021-06-05T04:25:39+5:30

पिण्याचे शुद्ध पाणी, तात्पुरती निवास व्यवस्था सुस्थितीत असावी, जेवणाची व्यवस्था आदींबाबत नियोजन करण्यात यावे. प्रत्येक गावात ही व्यवस्था कोण ...

Mechanisms should be in place to deal with natural disasters | नैसर्गिक आपत्तीचा सामना करण्यासाठी यंत्रणा सज्ज ठेवावी

नैसर्गिक आपत्तीचा सामना करण्यासाठी यंत्रणा सज्ज ठेवावी

पिण्याचे शुद्ध पाणी, तात्पुरती निवास व्यवस्था सुस्थितीत असावी, जेवणाची व्यवस्था आदींबाबत नियोजन करण्यात यावे. प्रत्येक गावात ही व्यवस्था कोण करणार आहे, याची खात्री करून घ्यावी. दर निश्चित करण्यात यावे. जनरेटर उपलब्ध करून दिला जावा. वीज गेल्यानंतर अडचणींचा सामना करावा लागतो. औषधसाठा ठेवावा, मॉक ड्रील घ्याव्यात. धोक्याचे फलक लावण्यात यावेत, ही जबाबदारी स्थानिक स्वराज्य संस्थांची आहे. रस्ते, पूल तपासणी करून घ्यावी. तसे फलक लावावे. जुन्या पुलांची तपासणी करावी. धोकादायक असल्यास फलक लावावा. नाल्यांची सफाई करावी. संपर्क क्रमांक अद्ययावत करण्यात यावेत. बाधित गावात कुठल्या कंपनींचे नेटवर्क प्रभावी कार्य करते, याची माहिती ठेवावी व शक्य असल्यास त्या कंपनीचे मोबाइल असलेल्यांची माहिती एस.ओ.पी.मध्ये असावी. अशा सूचना त्यांनी दिल्या.

प्रत्येक तालुक्यात हेलीपॅडची व्यवस्था करावी. जागेचे अक्षांश रेखांश कळवावे. स्थानिक नावाडी व पोहणाऱ्यांची यादी अद्ययावत करण्यात यावी. त्यांना मानधन देण्यात येईल. पब्लिक अनाउंसमेंट सिस्टिम अद्ययावत ठेवण्यात यावी. पूरबाधित घरे व नदीच्या काठावरील घरे तसेच नादुरुस्त घरे व पडझड झालेल्या घरांना नोटीस देण्यात यावी. त्यांना तात्पुरते स्थलांतरित करण्यात यावे. ही कामे प्राधान्याने केल्यास येणाऱ्या संभाव्य आपत्तीचा सामना करताना अडचणी निर्माण होणार नाहीत. एसडीआरएफमार्फत प्रशिक्षण देण्यात येणार आहे. बाधित गावांशी संबंधित ग्रामसेवक, तलाठी, मंडळ अधिकारी यांना रेस्कू ऑपरेशन कसे करायचे, याबाबत हे प्रशिक्षण असणार आहे. आपत्ती निवारणासाठी प्रत्येक विभागाने नोडल अधिकारी नेमावा व त्याचा संपर्क क्रमांक कंट्रोल रूमला देण्यात यावा. गावातील सरपंच, मुख्याध्यापक यांचीही संपर्क यादी अद्ययावत करावी. आरोग्य विभागाने औषधसाठा पुरेसा उपलब्ध ठेवावा. नाली खोलीकरण व स्वच्छता प्राधान्याने करावी. ही सगळी कामे मिशन मोडवर तातडीने करण्याचे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांनी यंत्रणांना दिले. आपत्ती व्यवस्थापन अधिकारी अभिषेक नामदास यांनी सादरीकरण केले.

बॉक्स

तालुक्यात कंट्रोल रूम

सर्व तालुक्यात कंट्रोल रूम कार्यान्वित करावी. तहसीलदार यांनी ती अद्ययावत आहे किंवा नाही याबाबत नियमितपणे माहिती घ्यावी. एक चेकलिस्ट ठेवावी. त्यानुसार काम होते किंवा नाही, याचा सुद्धा आढावा घ्यावा. त्यांना प्रशिक्षण द्यावे. कंट्रोल रूम ॲक्शन मोडमध्ये ठेवावी. कंट्रोल रूमचा नंबर प्रसिद्ध करावा व प्रत्येक ग्रामपंचायतीमध्ये लावावा. या काळात शाळेची एक चावी ग्रामसेवकांनी आपल्याकडे ठेवावी. शाळेची स्वच्छता करून घ्यावी, असेही त्यांनी सांगितले. भंडारा कंट्रोल रूमचा १०७७ हा क्रमांक व ०७१८४ - २५१२२२ हा क्रमांक चोवीस तास कार्यान्वित असणार आहे.

Web Title: Mechanisms should be in place to deal with natural disasters

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.