रोजगार हमी योजनेची कामे यंत्राने
By Admin | Updated: May 13, 2014 23:19 IST2014-05-13T23:19:58+5:302014-05-13T23:19:58+5:30
मोहाडी तालुक्यात होत असलेले महात्मा गांधी रोजगार हमी योजनेंतर्गत कुशल कामे यंत्राने होत असून बोगस मजुरांचा मस्टर तयार केला जात आहे.

रोजगार हमी योजनेची कामे यंत्राने
लोहारा (जांब) : मोहाडी तालुक्यात होत असलेले महात्मा गांधी रोजगार हमी योजनेंतर्गत कुशल कामे यंत्राने होत असून बोगस मजुरांचा मस्टर तयार केला जात आहे. त्यामुळे मजूर वर्गामध्ये असंतोष पसरला असून मोहाडी तालुक्यात होत असलेल्या कुशल कामाची चौकशी करण्याची मागणी तालुक्यातील जनतेने केली आहे. प्रत्येक कुटुंबाला वर्षाकाठी १00 दिवस रोजगार उपलब्ध करू, असे सांगणार्या अधिकार्यांच्या व लोकप्रतिनिधीच्या डोळ्यासमोर मजुरांच्या हातांना काम मिळून गोर गरीब मजुरांना रोजगार मिळण्याची अपेक्षा होती. कुशल कामे मोहाडी तालुक्यात हिवरा कांद्री, बोंद्री, आंधळगाव, वासेरा, सकरला, धोरपड, खैरलांजी, धुसाळा, नवेगाव परिसरासह संपूर्ण तालुक्यात यंत्राच्या सहाय्याने केल्या जात आहे. बोगस मजुरांच्या नावानी मस्टर तयार करून बिलसुद्धा अधिकारी, अभियंता यांच्या आशीर्वादाने ठेकेदार उचल करीत असल्याची तक्रार आहे. यामध्ये संबंधित विभागाच्या अधिकार्यासह अभियंत्याचे ओले आत होत असल्याने याकडे अधिकारी डोळेझाक करीत असल्याचे बोलले जात आहे. कुशल कामाची चौकशी करण्याची मागणी परिसरातील जनतेने केली आहे. (वार्ताहर)