पाणीटंचाईवर मात करण्यासाठी उपाययोजनांना केली सुरुवात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 19, 2021 04:32 IST2021-04-19T04:32:37+5:302021-04-19T04:32:37+5:30
गोंदिया : जिल्ह्यातील गोरेगाव तालुक्यातील ५ व सडक अर्जुनी तालुक्यातील १२ नवीन विंधन विहिरीच्या कामांना व सडक अर्जुनी तालुक्यातील ...

पाणीटंचाईवर मात करण्यासाठी उपाययोजनांना केली सुरुवात
गोंदिया : जिल्ह्यातील गोरेगाव तालुक्यातील ५ व सडक अर्जुनी तालुक्यातील १२ नवीन विंधन विहिरीच्या कामांना व सडक अर्जुनी तालुक्यातील ४ नळ पाणीपुरवठा योजना दुरुस्ती आणि सडक अर्जुनी तालुक्यातील १२ विहिरीतील गाळ काढण्याच्या कामांना जिल्हाधिकारी दीपककुमार मीना यांनी टंचाई निवारणाच्या कामासाठी असलेल्या अधिकाराचा वापर करून प्रशासकीय मान्यता दिली आहे.
गोरेगाव तालुक्यातील बबईटोला (बबई) येथे नानू पटले यांच्या घराजवळ घुमर्रा येथे हनुमान मंदिराजवळ, मिर्जागडटोली येथे वनिता मठाले यांच्या घराजवळ, नवाटोला/पलखेडा येथे नानाजी पटले यांच्या घराजवळ, चिल्हाटी येथे कला मेश्राम यांच्या घराजवळ, सडक-अर्जुनी तालुक्यातील राजगुडा येथे तेजराम मेश्राम यांच्या घराजवळ, भोंडकीटोला (दल्ली) येथे भोंडकीटोला परिसरात, अबकारीटोला (शेंडा) येथे चुडुरका (डव्वा येथे समाज मंदिरजवळ, डुंडा येथे भोजराज कटरे यांच्या घराजवळ, गोंगले येथे शाळेच्या परिसरात, खोबा येथे रवींद्र मलमे यांच्या घराजवळ, कोकणा येथे मोडकू भेंडारकर यांच्या घराजवळ, कनेरी येथे लक्ष्मण भगत यांच्या घराजवळ, पळसगाव राका येथे श्रीराम शहारे यांच्या घराजवळ, राका येथे ग्रामपंचायतजवळ फुटाळा येेथे सदाशिव सोनवाने यांच्या घराजवळ, सडक-अर्जुनी तालुक्यातील सौंदड, कोहमारा, पांढरी, म्हसवाणी येथे नळ पाणीपुरवठा योजना विशेष दुरुस्ती, सडक अर्जुनी तालुक्यातील कन्हारपायली येथे सार्वजनिक विहिरीतील गाळ काढणे तसेच सौंदड, बाम्हणी, पळसगाव, सावंगी, कनेरी राम, राजगुडा, डुंडा, खाडीपार, मुरपार, उशीखेडा, टेकरी येथे नळ पाणीपुरवठा योजना विशेष दुरुस्ती अशा एकूण ३१ लाख ९६ हजार ११२ रुपयांमधून कामे करण्यात येणार आहेत.