मौलाना आझाद आर्थिक विकास महामंडळाची सभा उत्साहात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 15, 2021 04:24 IST2021-07-15T04:24:52+5:302021-07-15T04:24:52+5:30
सभेला माजी आमदार जैन, राष्ट्रवादी कॉँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष विजय शिवणकर व महामंडळाचे समन्वयक नफिस शेख प्रामुख्याने उपस्थित होेते. याप्रसंगी ...

मौलाना आझाद आर्थिक विकास महामंडळाची सभा उत्साहात
सभेला माजी आमदार जैन, राष्ट्रवादी कॉँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष विजय शिवणकर व महामंडळाचे समन्वयक नफिस शेख प्रामुख्याने उपस्थित होेते. याप्रसंगी शेख यांनी, बचतगट, तांत्रिकी शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना तसेच छोटे व्यवसाय करणाऱ्यांना कमी व्याजाने आर्थिक कर्ज व अल्पसंख्याक समाजाला मिळणाऱ्या इतर योजनांची माहिती दिली. याप्रसंगी सडक-अर्जुनी तालुकाध्यक्ष मतीन शेख, देवरी तालुकाध्यक्ष इरशाद शेख यांना माजी आमदार जैन व जिल्हाध्यक्ष शिवणकर यांच्या हस्ते नियुक्तीपत्र देण्यात आले. सभेला सैयद इकबाल, एफआरटी शहा, डॉ. कय्यूम खान, युनूस शेख, अरशद खान, हाजी मतीन शेख, फारूक पटेल, अमीन शेख, इरशाद खान, सबील कुरैशी, पाशा शेख, सतीश पारधी, अनिसा पठाण, जायस्वाल व अन्य उपस्थित होते. जिल्हाध्यक्ष खान यांच्या नेतृत्वात मौलाना आझाद आर्थिक विकास महामंडळाच्या जिल्हा कार्यालयासाठी जागा उपलब्ध करून देण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले.