कृषी चिकित्सालयातून साहित्यांची चोरी
By Admin | Updated: August 28, 2014 23:35 IST2014-08-28T23:35:58+5:302014-08-28T23:35:58+5:30
पालोरा आबादी येथे प्रशासकीय ३५ एकर असलेला कृषी चिकित्सालय आहे. आजही येथे अनेक कर्मचारी व अधिकारी कार्यरत आहेत. प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे ३५ एकरात पांढरा पढार पिकत आहे.

कृषी चिकित्सालयातून साहित्यांची चोरी
पालोरा (चौ.) : पालोरा आबादी येथे प्रशासकीय ३५ एकर असलेला कृषी चिकित्सालय आहे. आजही येथे अनेक कर्मचारी व अधिकारी कार्यरत आहेत. प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे ३५ एकरात पांढरा पढार पिकत आहे.
येथील कर्मचारी रात्रीचा फायदा घेवून येथील साहित्याची चोरी करून भंगार दुकानदाराला विकत आहेत. अनेक साहित्य घरी नेवून ठेवले आहेत. अनेकदा भरदिवसा भंगार दुकानदाराला बोलावून खुलेआम हजारो रूपयाचे साहित्य विकले जात आहे. हा सर्व प्रकार लागूनच असलेले गावकरी उघड्या डोळ्यांनी पाहत आहेत. मात्र येथील अधिकाऱ्याला हे दिसत नाही. कारण ते कार्यालयात उपस्थितच राहत नही. आठवड्यातून एकदा येवून पुर्ण दिवसाच्या सह्या करून मोकडे होत आहेत. येथील साहित्य चोरीचे प्रमाण वाढले आहे. कृषी कार्यालयाचे कोणतेही अधिकारी याकडे भिरकावून पाहत नाही. शासनाकडून शेतीची मशागत करण्यासाठी ट्रॅक्टर देण्यात आला. येथील कर्मचारी या ट्रॅक्टरचा दुरउपयोग करतानी दिसत आहे. ट्रॅक्टरमध्ये डिझल टाकून घरची शेतीची मशागत करून किरायाने पाठवित आहेत. वेगवेगळे बिल काढून शासनाच्या तिजोरीला चुना लावण्याचा प्रकार येथे सुरू आहे. बाहेरून येणारे यात्रेकरू जेव्हा या कृषी चिकित्सालयाकडे पाहतात तेव्हा त्यांना हसू आवरत नाही.
एकीकडे शासनाकडून सांगितले जाते की, भारत हा कृषी प्रधान देश आहे. भारताची अर्थसंकल्पना ही शेतीवर आधारित आहे. शेतीचा उत्पादनात वाढ व्हावी म्हणून अनेक योजना राबविल्या जात आहेत. मात्र दुसरीकडे प्रशासनाच्या उदासीन धोरणामुळे जिल्ह्यात असे अनेक कृषी चिकित्सालय आहेत की ते राम भरोसे सुरू आहेत. (वार्ताहर)