विषारी पाण्याने मासोळ्यांचा मृत्यू
By Admin | Updated: September 24, 2015 00:41 IST2015-09-24T00:41:16+5:302015-09-24T00:41:16+5:30
विषारी औषधी धानावर फवारण्यात आल्यानंतर हे पाणी तलावात पोहोचले. त्यामुळे या तलावातील लाखो मासे मृत्यूमुखी पडले.

विषारी पाण्याने मासोळ्यांचा मृत्यू
दोन लाखांचे नुकसान : कन्हाळगाव येथील प्रकार
लाखांदूर : विषारी औषधी धानावर फवारण्यात आल्यानंतर हे पाणी तलावात पोहोचले. त्यामुळे या तलावातील लाखो मासे मृत्यूमुखी पडले. अंदाजे दोन लाखांपेक्षा अधिक किमतीचे हे मासे मृत्यूमुखी पडल्यामुळे मासेमार बांधवावर उपासमारीचे संकट ओढवले आहे.
या तलावात एकलव्य मच्छीमार संस्थेअंतर्गत दरवर्षी पाच लाख रुपयांची गुंतवणूक करून मासेमारी करण्यात येते. कन्हाळगावच्या हद्दीत येणाऱ्या या शासकीय तलावाचा परिसर ३०.५९ हेक्टर ईतके आहे. मात्र या तलावात अतिक्रमण वाढल्यामुळे तलावाचे क्षेत्र घटले आहे. या घटनेची मौका चौकशी तलाठ्याकडून करण्यात आली त्यावेळी सरपंच सुमन रामटेके, नरेश मांढरे व नागरिक उपस्थित होते. शासनाकडून नुकसान भरपाई देण्यात यावी, तलावातील अतिक्रमण हटविण्यात यावे, संस्थेवरील कर्ज माफ करण्यात यावे, या तलवाची मोजणी करून अतिक्रमण हटविण्यात यावे व शासनाच्या योजनांचा लाभ देण्यात यावा, अशी मागणी एकलव्य भोई ढिवर मच्छीमार सहकारी संस्थचे अध्यक्ष वासुदेव वलथरे, बाबूराव वाघधरे, टिकाराम वाघधरे, शेखर वलथरे, कैलाश दिघोरे, संदीप वाघधरे, इस्तारी शहारे, नारायण कुंभले, चंद्रशेखर वाघधरे, सेवक मांढरे आदींनी केली आहे. (शहर प्रतिनिधी)