मास्क शिलाई, विक्रीसह कोविड लसीकरण नोंदणीसाठी महिलांचा पुढाकार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 22, 2021 04:39 IST2021-09-22T04:39:17+5:302021-09-22T04:39:17+5:30
लाखांदूर येथे युनिसेफ अंतर्गत माविमद्वारा माहेश्वरी लोकसंचालित साधन केंद्र, लाखांदूरच्या वतीने १५ सप्टेंबरला राजनी येथे कोविड -१९ बाबत जनजागृती ...

मास्क शिलाई, विक्रीसह कोविड लसीकरण नोंदणीसाठी महिलांचा पुढाकार
लाखांदूर येथे युनिसेफ अंतर्गत माविमद्वारा माहेश्वरी लोकसंचालित साधन केंद्र, लाखांदूरच्या वतीने १५ सप्टेंबरला राजनी येथे कोविड -१९ बाबत जनजागृती करण्यात आली. १६ सप्टेंबरला नविदिशा लोकसंचालित साधन केंद्र, पवनी येथे गणेश उत्सव मंडळाच्या सहकार्याने मास्क वाटप करुन सॅनिटाइजरने हात स्वच्छ धुण्याचे प्रात्यक्षिक व लसीकरणाबाबत जनजागृती करण्यात आली.
बॉक्स
४५ तालुक्यांत राबवणार उपक्रम
या उपक्रमांतर्गत महिलांना मास्क निर्मिती प्रशिक्षण, कोविड -१९ च्या प्रादुर्भावाबाबत जनजागृती कार्यक्रम करून मास्क विक्री, कोविड -१९ चाचणीसाठी नोंदणी प्रक्रिया सुरू करणे, मायग्रंट सपोर्ट सर्विस सेंटर स्थापन करण्यात येणार आहे. हा उपक्रम माविम व युनिसेफचा संयुक्त उपक्रम असून राज्यातील भंडारा, वर्धा, यवतमाळ, वाशिम, बुलडाणा, अकोला, अमरावती जिल्ह्यांतील ४५ सीएमआरसीमध्ये राबवण्यात येणार असल्याने जिल्ह्यासाठी ही अभिमानाची बाब आहे. भंडारा जिल्ह्यातील माविंमच्या कोरोना काळातील कार्याचा राज्यभरातून कौतुक होत आहे.