हुतात्मा स्मारकाला हुतात्मा होण्याची वेळ

By Admin | Updated: January 29, 2015 23:00 IST2015-01-29T23:00:46+5:302015-01-29T23:00:46+5:30

मजा आयेगा जब हमारा राज देखेगे की, अपनीही जमी होगी. अपना आॅसमान होगा. शहीदों की चिताओं पर लेगेंगे हर बरस मेले. वतनपर मिटने वालो का यही बाकी निशा होगा. तुमसर शहरात हुतात्मा

Martyr's memorial to be a martyr | हुतात्मा स्मारकाला हुतात्मा होण्याची वेळ

हुतात्मा स्मारकाला हुतात्मा होण्याची वेळ

मोहन भोयर - तुमसर
मजा आयेगा जब हमारा राज देखेगे की, अपनीही जमी होगी. अपना आॅसमान होगा. शहीदों की चिताओं पर लेगेंगे हर बरस मेले. वतनपर मिटने वालो का यही बाकी निशा होगा. तुमसर शहरात हुतात्मा स्मारकाचे केवळ अवशेष तेवढे शिल्लक आहे. ज्या हुतात्म्यांनी स्वातंत्र्याकरीता प्राणाहुणी देवून होतात्म्य पत्करले ते स्मारकस्थळी लघुशंकेचे स्थळ बनले आहे.
राज्य शासनाने सुमारे २५ ते ३० वर्षापुर्वी शहरातील नेहरू क्रीडांगणाजवळ मोकळ्या मैदानात हुतात्मा स्मारक तयार केले होते. सुरूवातीला हे स्थळ प्रेरणास्थ बनले होते. पुढील काळात या स्मारकाकडे दुर्लक्ष झाल्याने ते मोडकळीस आले. चॅनल गेट येथे चोरी गेले. तारे तुटले आहेत. स्मारकाचे वरचे लाकडी छत पूर्णत: तुटले आहेत. प्रशासनाचे व शासनाचे येथे दुर्लक्ष झाल्याने आता या हुतात्मा स्मारकाचे अवशेष तेवढे उरले आहेत. क्रीडांगण तथा शाळा महाविद्यालयात या परिसरात आहेत. टवाळखोऱ्यांचा येथे नेहमी घोळखा पहावयास मिळते. अनेक टवाळखोर येथेच लघुशंका करतात. या स्मारकाकडे कोणताच विभाग लक्ष देण्यास तयार नाही. येथे हुतात्म्याचा अपमान होत आहे. या स्मारकाची दुरूस्ती करावी नाही तर त्याला निदान भुईसपाट करावे, असा सूर उमटत आहे.
या स्मारकाच्या दर्शनी भागावर संगमरवर दगडावर हुतात्मा भुराची चानोरे, श्रीराम धुर्वे, राजाराम धुर्वे, हरी फाये, भंदूजी लोंदासे, पांडूरंग सोनवाने, माधव पडोळे, हरी पेंडारकर, हिरालाल मेहर यांची नावे कोरली आहेत. ब्राम्हणी तुमसर, मुंढरी येथील हुतात्मा स्वातंत्र्य संग्राम सैनिक आहेत.
भारताच्या स्वातंत्र्याकरीता प्राणाहूनी देऊन हौताम्य पत्करले त्यांच्या आणि अज्ञात हुतात्म्यांचाही स्मृतीस शतश: प्रणाम करण्याची या दगडावर कोरले आहे. तुमसर नगरपरिषदेसमोर हुतात्मा स्तंभ आहे. या स्तंभाचे नुकतेच नगराध्यक्ष अभिषेक कारेमोरे यांनी सौंदर्यीकरण केले हे स्थळ येणाऱ्या जाणाऱ्यांचे लक्ष वेधून घेते. हुतात्मा स्मारकाच्या दुर्देशेकडे लक्ष देवून नूतनीकरण करण्याकरिता प्रयत्न करण्याची गरज आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाचे याकडे सातत्याने दुर्लक्ष होत आहे. हुतात्मा स्मारक तयार झाल्यानंतर या स्मारकाकडे या विभागाने ढूंकूनही पाहिले नाही.

Web Title: Martyr's memorial to be a martyr

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.