सभापती भवन बनले बाजारातील शौचालय
By Admin | Updated: December 22, 2014 22:40 IST2014-12-22T22:40:55+5:302014-12-22T22:40:55+5:30
येथील अधिकाऱ्यांसह पदाधिकाऱ्यांसाठी तयार करण्यात आलेल्या शासकीय निवासस्थाची दयनीय अवस्था झाली आहे. बाजार चौकातील सभापती भवन शौचालय बनले असून सभापतींना राहण्यासाठी दुसरी सदनिका नाही.

सभापती भवन बनले बाजारातील शौचालय
राजू बांते - साकोली
येथील अधिकाऱ्यांसह पदाधिकाऱ्यांसाठी तयार करण्यात आलेल्या शासकीय निवासस्थाची दयनीय अवस्था झाली आहे. बाजार चौकातील सभापती भवन शौचालय बनले असून सभापतींना राहण्यासाठी दुसरी सदनिका नाही.
साकोली येथील बाजार चौकात सभापती भवन असून पाच वर्षांपूर्वी पर्यंत हे भवन सुस्थितीत होते. या भवनात सभापती राहत होते. तर कधीकधी यात पंचायत समितीच्या बैठका सुद्धा घेतल्या जात होत्या. मात्र कालांतराने या सभापती भवनाकडे दुर्लक्ष झाले. सार्वजनिक विभागाने या सभापती भवनाचा दुरुस्तीकडे लक्ष दिले नाही. परिणामी सभापती भवनाची अवस्था खराब झाली. काही दिवसानंतर या सभापती भवनातील दरवाजे खिडक्या, लोखंडी ग्रील चोरून नेल्या. याची साधी तक्रार खंडविकास अधिकारी किंवा सभापती यांनी पोलिसात दिली नाही.
हे सभापती भवन बाजार चौकातील शौचालय बनले. यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. त्यामुळे याकडे प्रशासनाने लक्ष देणे गरजेचे आहे.