शहरं
Join us  
Trending Stories
1
"...का तूच खातो सगळं रेटून? आम्हाला तर माहीत आहे, या जीआरवरच संपूर्ण मराठवाडा बसतो!"; भुजबळांना डीवचत जरांगेंचा दावा!
2
“राज-उद्धव ठाकरे बंधूंच्या घट्ट युतीतून मुंबईत मराठी माणूस महापौर होईल”; संजय राऊतांचा दावा
3
Apple च्या भारतातील गुंतवणूकीवर ट्रम्प नाराज; टिम कुक यांना सर्वांसमोर थेट प्रश्न विचारला...
4
अरे बापरे! महाराष्ट्रात वाघांनी घेतला २१८ जणांच्या नरडीचा घोट, देशात सर्वाधिक हल्ले राज्यात
5
प्रताप सरनाईकांनी घेतली देशातील पहिली Tesla Model Y कार; नातवाला दिली भेट, म्हणाले...
6
रणबीर कपूरशी संबंधित 'या' कंपनीच्या शेअरमध्ये मोठी तेजी; ब्लॉक डीलनंतर शेअरने गाठले अप्पर सर्किट
7
दिल्लीहून इंदूरला जाणाऱ्या एअर इंडियाच्या विमानाचे आपत्कालीन लँडिंग, विमानात १६१ प्रवासी होते
8
मुस्लीम, शेतकऱ्यांसाठीही मंत्रिमंडळ उपसमिती स्थापन करा; मनोज जरांगेंच्या मुख्यमंत्र्यांकडे नवीन मागण्या काय?
9
No Cost EMI: फुकट काहीच नाही, समजून घ्या गणित; खरंच व्याज द्यावं लागत नाही का?
10
Mumbai on Alert: ४०० किलो RDX सह १४ दहशतवादी भारतात घुसले; आत्मघातकी हल्ल्याची धमकी देणारा मुंबई पोलिसांना मेसेज
11
दूध, ब्रेड, पनीर, भाज्या.., त्या २० गोष्टी ज्या तुम्ही दररोज खरेदी करता, GST कपातीनंतर किती होणार स्वस्त?
12
लॉटरी लागली नाही, तरी तिकिटाचे पैसे वाया जाणार नाहीत, सरकार व्याजासह परत देणार; प्रस्ताव विचाराधीन
13
वॉशिंग्टनमधील मराठी कला मंडळाच्या अमृत महोत्सवी वर्षात १५०० भाविकांच्या उपस्थितीत बाप्पाला निरोप 
14
Ajit Pawar: ज्या कार्यकर्त्यांसाठी अजित पवारांनी अंजली कृष्णा यांना दिला दम, त्यांच्यावरच गुन्हा दाखल
15
"चेंगराचेंगरीतून राजापर्यंत पोहोचण्याचं धाडस आम्ही केलं, पण...", 'लालबागचा राजा'च्या दर्शनाला गेलेल्या तुषार कपूरला आला असा अनुभव
16
अनंत चतुर्दशी २०२५: एक दृष्टांत, प्रत्यक्ष देव प्रकट; तुम्ही घेतले का शेषशायी विष्णू दर्शन?
17
मृत्यू पंचकात अनंत चतुर्दशी-चंद्रग्रहण २०२५: १५ मिनिटांचे स्तोत्र म्हणा; अनंताची कृपा मिळवा
18
Crime: ​​​​​​​स्पाय कॅमेऱ्याने महिलेचे आक्षेपार्ह व्हिडिओ रेकॉर्ड; पायलटला अटक
19
वाढत्या महागाईत निवृत्तीचे नियोजन कसे कराल? 'या' टिप्स फॉलो करुन चाळीशीच्या आत कोट्यधीश व्हा
20
आशिया चषक हॉकी: भारताचा धडाकेबाज विजय; मलेशियाचा ४-१ असा उडवला धुव्वा

अनेकांचे हात सरसावले मदतीला

By admin | Updated: August 14, 2014 23:34 IST

अनियंत्रित झालेल्या तुमसर-मुंढरी बसला काल मोहगाव नाल्याजवळील वळणावर भिषण अपघात झाला. सायंकाळी ५ वाजताच्या सुमारास सुमारे ५३ प्रवाशांना घेऊन येणारी बस

मदतीमुळेच बचावले जीव : मोहगाव वळणावरील अपघातकरडी(पालोरा) : अनियंत्रित झालेल्या तुमसर-मुंढरी बसला काल मोहगाव नाल्याजवळील वळणावर भिषण अपघात झाला. सायंकाळी ५ वाजताच्या सुमारास सुमारे ५३ प्रवाशांना घेऊन येणारी बस बाजूच्या झाडाला धडकली. जोरदार धडकेने बसचा समोरीेल भग पूर्णत: क्षतीग्रस्त झाला. अपघात होताच प्रवासी जीवाच्या आंकाताने ओरडले. जो तो बचावासाठी ओरडत होता. शेतावरील नागरिक मदतीला धावले. रस्त्यावरील नागरिक थांबले. भयावह स्थिती पाहून घाबरलेल्या अवस्थेत त्यांनी करडी पोलिसांना माहिती दिली.अपघाताची घटना संपूर्ण परिसरात वाऱ्यासारखी पसरली. अनेकांंचे फोन वारंवार खणखणत होते. मोबाईलवरुन घटना सांगितली जात होती.हजारो नागरिकांच्या गाड्या अपघातग्रस्त ठिकाणाच्या दिशेने धावू लागल्या. जो-तो घटनेची माहिती सांगत सुटला होता. बसचा दरवाजा दाबल्या गेल्याने उघडत नव्हता. जखमांनी शाळेचे विद्यार्थी व प्रवासी विव्हळत होते. अनेकांचे डोके फुटले, दात तुटले, हातपाय फ्रॅक्चर झाले. प्रवासी सिटांमध्ये फसले होते. बसमध्ये रक्ताचा सडाच पडला होता. रस्त्यावर बसच्या तुटलेल्या भागाचे अवशेष अस्तव्यस्त विखुरलेले होते. मदतीसाठी मोठी अडचण होती. नागरिकांनी हिकमतीने दरवाजा तोडला. प्रवाशांना बाहेर काढण्याचे काम सुरू झाले. मात्र दाबल्या गेलेल्या भागातून प्रवाशांना काढणे जोखमीचे होते.दोन तासापर्यंत नागरिकांचे शर्थीचे प्रयत्न सुरू होते. हजारो हातांनी बस ढकलण्याचे प्रयत्न असफल प्रयत्न होत होते. तीनदा ट्रकांना दोर बांधून बस ओढल्या गेली. दोर तुटले, परंतु गेरमध्ये फसलेली बस हलत नव्हती. वैनगंगा शुगर अँड पॉवर करखान्याचे अधिकारी व कामगार त्यासाठी प्रयत्न करीत होते. देव्हाडापासून मुंढरी, पालोरा, जांभोरा, करडी, निलज खुर्द, निलज बुज., कान्हळगाव, मोहगाव नागरिक मदतीसाठी झटत होते. करडीचे सहाय्यक फौजदार अश्विन मेहर, पोलीस हवालदार आसाराम नंदेश्वर, पोलीस नायक गौरीशंकर गौतम यांनी भंडारा, तुमसर येथून अ‍ॅम्बुलन्स बोलविल्या.निलज रेतीघाटाचे कंत्राटदार पिंटू शर्मा, सामाजिक कार्यकर्ते निशिकांत इलमे यांच्या दोन जेसीबीने बस ओढल्या गेली. नाना ढेंगे यांनी स्वत:च्या वाहनाने गॅस कटर आणून सीट व बसचा समोरील भाग कापून फसलेले विद्यार्थी व प्रवाशांना काढण्यास मदत केली.जांभोरा येथील जय संतोषी मा विद्यालयाचे संचालक सुरेश गहाणे, गौरीशंकर राऊत, उमेश तुमसरे, गणेश ठवकर, जि.प. सदस्य महेंद्र शेंडे, के.बी. चौरागडे, सियाराम साठवणे, श्रीकांत डोरले, उमेश इलमे यांनी स्वत:च्या खाजगी वाहनातून जखमींना करडी प्राथमिक आरोग्य केंद्रात पोहचविण्यास मदत केली.करडी प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. झोडे, डॉ.शेख व कर्मचाऱ्यांनी तत्परतेने वैद्यकीय सेवा पुरवून तसेच शासकीय अ‍ॅम्बुलन्स बोलावून २८ रुग्णांना भंडारा सामान्य रुग्णालयात रेफर केले. उर्वरित २२ जखमींवर उपचार करुन रात्री घरापर्यंत पोहचविण्यास सहकार्य केले. वृद्धांपासून तरुणांपर्यंत सर्वांनी वेळेवर मदत दिल्याने अनेकांचे प्राण वाचले. (वार्ताहर)