दारूच्या महापुरात अनेक कुटुंबाची वाताहत
By Admin | Updated: November 18, 2014 22:51 IST2014-11-18T22:51:00+5:302014-11-18T22:51:00+5:30
लाखांदूर पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या राजनी गावामध्ये अवैध रेती दारू विक्री जोमात सुरू आहे. देशी दारू शौकीनांना एका पाण्यासाठी तब्बल ६० रूपये मोजावे लागतात. महिला ग्रामसभेमध्ये राजनी

दारूच्या महापुरात अनेक कुटुंबाची वाताहत
कऱ्हांडला : लाखांदूर पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या राजनी गावामध्ये अवैध रेती दारू विक्री जोमात सुरू आहे. देशी दारू शौकीनांना एका पाण्यासाठी तब्बल ६० रूपये मोजावे लागतात. महिला ग्रामसभेमध्ये राजनी गावात दारूबंदीचा ठराव घेवून अवैध रेती दारूबंदी केल्यानंतरही पुन्हा दारू विक्री सुरू झाल्याने पोलीस प्रशासनावर प्रश्नचिन्ह निर्माण झाला आहे.
मागील वर्षी एप्रिल महिन्यामध्ये राजनी गावात भागवत सप्ताहाचे धार्मिक कार्यक्रम सुरू असताना दारू बंदीची मोहिम राबविण्यात आली. स्वच्छता मोहिम राबवली. तोरण पताका लावल्या, सडा साखर करून घरोघरी रांगोळ्या घत्तलून गावात रमणीय, उत्साही, आनंदमय वातावरण निर्माण झाले. संपूर्ण गावकरी परमेश्वराचे गजर करत नामचिंतणात दंग झाले होते. अशांत दारूच्या नशेत धुंद असणारांकडून धिंगाणा घालत आनंदात बांधा निर्माण झाली. भागवताच्या माध्यमातून एकत्र आलेल्या माणसातील माणूसपणा जागा झाला. उत्साहित झालेल्या समाजाने दारूबंदीसाठी आवाज उठवला. यात विशेष करून महिलांनी पुढाकार घेतला. त्यावेळी भागवताच्या माध्यमातून समाज प्रबोधन करणाऱ्या प्रवचनकार महिलाच होत्या. दारूच्या विषयावर प्रभावी मार्गदर्शन झाल्याने महिलामध्ये प्रभावी शक्ती जागृत झाली.
भागवत सप्ताह स्थळीच रात्रीला ग्राम सभा घेण्यात आली. ग्रामसभेमध्ये संपूर्ण गावातील महिला पुरूषानी भाग घेतला. पन्नास महिलांची दारूबंदी समिती स्थापन करण्यात आली. राजनी गावात दारूबंदीचा ठराव घेण्यात आला. ठरावाची सत्यप्रत लाखांदूर पोलीस स्टेशनला देण्यात आली. दारूबंद झाली आणि गावामध्ये चांगले वातावरण निर्माण झाले.
राजनी गावामध्ये अनेक वर्षापासून अवैध दारूविक्री सुरू आहे. दारूच्या व्यसनात कित्येकाना जीव गमवावा लागला आहे. नवऱ्याविना बायको आणि बापा विना लेकर असे कित्येक कुटूंब त्या गावात निराधाराचे जीवन जगत आहेत. दारूच्या नशेत कित्येकांनी आत्महत्या केली तर कित्येक प्रयत्न करून बचावलेले आहेत. लाखांदुरच्या पोलीस ठाणेदाराकडून नागरिकाची अपेक्षा पूर्ण होण्याची शंकेत दिसत नाही. जिल्हा पोलिसांनी याकडे लक्ष घालून कारवाईची मागणी नागरिकांनी केली आहे. (वार्ताहर)