‘साकोली के सितारे’ने जोपासली माणुसकी

By Admin | Updated: June 13, 2017 00:16 IST2017-06-13T00:16:29+5:302017-06-13T00:16:29+5:30

सध्या व्हॉट्सअपचे जाळे सर्वत्र पसरले आहे. लहानापासून तर वयोवृध्दापर्यंत या व्हॉट्सअपचा मोहात सापडले आहेत.

Manusaki's 'Sakoli's Stars' | ‘साकोली के सितारे’ने जोपासली माणुसकी

‘साकोली के सितारे’ने जोपासली माणुसकी

साकोलीवासीयांचा स्त्युत्य उपक्रम : अनाथ मुलींना ५५ हजार रुपयांची मदत
संजय साठवणे । लोकमत न्यूज नेटवर्क
साकोली : सध्या व्हॉट्सअपचे जाळे सर्वत्र पसरले आहे. लहानापासून तर वयोवृध्दापर्यंत या व्हॉट्सअपचा मोहात सापडले आहेत. एरव्ही हा सर्व टाईमपास म्हणून समजला जाणारा व्हॉट्सअप कधीकधी कुणाच्या आयुष्याचा आधार बनतो. असाच प्रकार साकोली येथे पाहायला मिळाला.
साकोली के सितारे या ग्राममधील सर्वांनी जमेल तशी वर्गणी गोळा करीत अनाथ मुलींना ५५ हजार रुपयांची आर्थिक मदत करुन साकोली के सितारे या नावाप्रमाणेच सिताऱ्याप्रमाणेच चकुन माणुसकी दाखवुन दिली.
गोंदिया जिल्ह्यातील अर्जुनी मोरगाव तालुक्यातील निमगांव येथील नाभीक समाजातील सुर्यवंशी कुटुंबीयांवर संकट कोसळले. अशी बातमी साकोली के सितारे या व्हॉटस्अप ग्रृपवर वाचायला मिळाली. ही बातमी वाचल्यावर खरोखरच प्रत्येकाच्या डोळ्यातून अश्रु निघाले. सुर्यवंशी दाम्पत्यांच्या २५ दिवसातच मृत्यू झाला. या दाम्पत्यांच्या ४ लहान मुली अनाथ झाल्या होत्या. या बातमीची प्रतयक्षात निमगाव येथे जाऊन चौकशी केली व लगेच मदतीसाठी सर्व सदस्यांचे हात समोर आले व तब्बल ५५ हजार रुपयांची मदत त्या चारही मुलींच्या स्वाधीन केली. त्यामुळे या साकोली के सितारे या व्हॉटस्अप ग्रृपला इइंसानीयत के सितारे असे म्हटले तरी ती अतिशयोक्ती ठरणार नाही.यावेळी डॉ. अजय तुमसरे, अखिलेश गुप्ता, नरेंद्र वाडीभस्मे, ओम गायकवाड, रुपेश खेडीकर, विष्णु रणदिवे, मुशीर खान, अमोल हलमारे, डॉ. येळे, जगदीश सुर्यवंशी उपस्थित होते.

Web Title: Manusaki's 'Sakoli's Stars'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.