Manegaon-Palandur road construction jam | मानेगाव-पालांदूर रस्ता बांधकाम ठप्प
मानेगाव-पालांदूर रस्ता बांधकाम ठप्प

ठळक मुद्देकंत्राटदाराची दिरंगाई : बांधकाम रखडल्याने अपघाताची भीती

लोकमत न्यूज नेटवर्क
लाखनी : तालुक्यातील मानेगाव (सडक) ते पालांदूर चौ. या रस्त्याचे डांबरीकरणाचे बांधकाम ठप्प आहे. या मार्गावरुन वाहन चालकांना वाहतुकीस धोका निर्माण झाला आहे. या रस्त्याने डांबरीकरणाचे बांधकाम संबंधित कंपनीने तातडीने पूर्ण करावे, अन्यथा आंदोलनाचा इशारा देण्यात आला आहे.
मानेगाव सडक ते पालांदूर या रस्त्याचे रुंदीकरणाचे, डांबरीकरणाचे बांधकाम गुरढापर्यंत शिवालय कंपनीने कंत्राट घेतले आहे. हे बांधकाम मागील वर्षापासून सुरु असून अर्धवट बांधकाम झाले आहे. रस्त्यावर डांबरीकरणासाठी विविध ठिकाणी काळी गिट्टी घातली आहे. रस्त्याचे डांबरीकरणाचे बांधकाम थांबवून गावालगतच्या नालीचे बांधकाम कंत्राटदार करीत आहे. तालुक्याच्या ठिकाणी कामासाठी जाणाऱ्या येणाºया गाडी चालकास रस्त्यावर गिट्टी पसरवून ठेवल्यामुळे कमालीचा त्रास सहन करावा लागत आहे. या रस्त्याने वाहतुक करताना एखादा मोठा धोका होण्याची शक्यता बळावली आहे. मानेगाव सडक ते पालांदूर रस्ता जागोजागी खोदून ठेवला आहे. याकडे संबंधित विभागाने लक्ष देण्याची गरज आहे.

Web Title: Manegaon-Palandur road construction jam

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.