आगीवर नियंत्रणासाठी मांडवीची रेती जाणार
By Admin | Updated: August 30, 2015 00:28 IST2015-08-30T00:28:21+5:302015-08-30T00:28:21+5:30
आगीवर नियंत्रण आणण्याकरिता दगडमिश्रीत रेती महत्त्वपूर्ण ठरते. त्यामुळे केंद्र शासनाच्या अखत्यारीत येणाऱ्या ...

आगीवर नियंत्रणासाठी मांडवीची रेती जाणार
तुमसर : आगीवर नियंत्रण आणण्याकरिता दगडमिश्रीत रेती महत्त्वपूर्ण ठरते. त्यामुळे केंद्र शासनाच्या अखत्यारीत येणाऱ्या सार्वजनिक उपक्रमांतर्गत तुमसर तालुक्यातील मांडवी रेतीघाट १५ वर्षाकरिता लिजवर देण्यात आले आहे. या नदी पात्रातून जाड रेती (खळंगा) वजा बारीक दगडांचा त्यात समावेश आहे. यापूर्वी चिखला व डोंगरी (बुज) येथील मॅग्नीज खाणीकरिता ३५ वर्षाकरीता पाथरी रेतीघाट भाडेतत्वावर दिले आहे.
वैनगंगा नदीपात्रातील रेतीचा दर्जा उच्च प्रतिचा आहे. या रेतीला सर्वत्र मोठी मागणी आहे. केंद्र शासनाच्या नियंत्रणातील सार्वजनिक उपक्रमाअंतर्गत आगीवर नियंत्रण आणण्याकरिता जाड रेतीची गरज असते. तुमसर तालुक्यातून बारमाही वाहणारी वैनगंगा नदीपात्रात जाड रेती मोठ्या प्रमाणात आहे. मांडवी घाटात अशी जाड बारीक दगड मिश्रीत रेती मुबलक प्रमाणात आहे. हा घाट १५ वर्षाकरिता एका कंत्राटदाराला देण्यात आला आहे. ही जाड दगड मिश्रीत रेती आगीवर नियंत्रण प्रस्थापित करण्याकरिता उपयोगात येते. केंद्र शासनाची याकरिता मंजूरी घ्यावी लागते. जिल्हा खनिकर्म तथा तहसीलदार यांचे येथे प्रत्यक्ष नियंत्रण राहणार आहे. तुमसर तालुक्यातील पाथरी नदीघाट चिखला व डोंगरी (बुज) मॉईल खाणीला सुमारे ३५ वर्षाकरिता नाममात्र शुल्कात देण्यात आले आहे. मॅग्नीज काढल्यानंतर खड्डे (पोकळी) भरण्याकरिता या रेतीचा उपयोग केला जाणार आहे. (तालुका प्रतिनिधी)