तहसीलदारांना मंडळ अधिकारी, तलाठ्यांचे निवेदन
By Admin | Updated: August 22, 2015 01:04 IST2015-08-22T01:04:29+5:302015-08-22T01:04:29+5:30
तालुक्यातील तलाठी व मंडळ अधिकाऱ्यांच्या मागण्या मार्गी लावण्यात याव्या यासाठी मंडळ अधिकारी व तलाठी यांनी तहसिलदारांना निवेदन दिले आहे.

तहसीलदारांना मंडळ अधिकारी, तलाठ्यांचे निवेदन
साकोली : तालुक्यातील तलाठी व मंडळ अधिकाऱ्यांच्या मागण्या मार्गी लावण्यात याव्या यासाठी मंडळ अधिकारी व तलाठी यांनी तहसिलदारांना निवेदन दिले आहे.
या निवेदनाप्रमाणे, सन २०१०-११ चा कृषि गणनेचा मोबदला देण्यात यावा, मासिक वेतन प्रत्येक महिन्याच्या ५ तारखेपर्यंत देण्यात यावा, तलाठ्यांच्या मुळ व दुय्यम सेवा पुस्तिका अद्ययावत करण्यात याव्या, तलाठी कार्यालयाचे थकीत व चालू कार्यालयीन भाडे त्वरित देण्यात यावे, साकोली तालुक्यातील सेंदुरवाफा, वडेगाव, चांदोरी व पळसगाव यातील कोतवालाची रिक्त पदे भरण्यात यावी, ग्रामपंचायत निवडणूक सन २०१०-११ व सन २०१५-१६ मधील हस्तलिखित मतदार यादीचे मेहनतावा मिळण्यात यावा.
नवीन तलाठ्यांना प्रशिक्षण देण्यात यावे, लोकसभा, विधानसभा तसेच जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीमधील अतिरिक्त कामाचा मोबदला देण्यात यावा, तसेच मतदान पथके पोहोचविण्याचा मोबदला देण्यात यावा, साकोली, एकोडी, पिंडकेपार, वडेगाव, बोदरा, वडद, बाप्पेवाडा या तलाठी कार्यालयातील सोयीसुविधा पुर्ण करण्यात याव्या, ज्या ठिकाणी तलाठी कार्यालयाची ईमारत नाही त्यांचा प्रस्ताव शासनाकडे पाठविण्यात यावे, वर्ष २०१३-१४ ला झालेल्या अतिवृष्टीच्या संगणीकृती याद्याचा मोबदला देण्यात यावा, प्रत्येक तलाठ्यांना सुधारित खंड ४ शासनातर्फे पुरविण्यात यावा.
तलाठ्यांना देण्यात आलेले लॅपटॉपच्या दुरूस्तीचा खर्च शासनाकडून मिळण्यात यावा, विभागीय दुय्यम सेवा परिधा वर्षातून दोनदा घेण्यात यावी, तलाठी कार्यालयामध्ये आवश्यक नक्कल रजिस्टर विहीत नमुन्यात छपाई करून देण्याबाबत पगारपत्रक स्लीप दरमहा मिळण्यात यावी.
अंशदायी पेंशन योजनेचे वार्षिक स्लीप देण्यात यावी, सुधारित अंतिम सेवाजेष्ठता यादी प्रत्येक वर्षी प्रसिद्ध करण्यात यावी, उत्पन्नाच्या दाखल्याचा नमुना ठरविण्यात यावा, रेतीघाटासंबंधी रात्रकालीन ड्युटी केल्यास बदली रजा देण्यात यावी, आदी मागण्यांचा समावेश आहे.
वरील मागण्या दि. ३१ पर्यंत निकाली काढण्यात यावा, अन्यथा सप्टेंबर महिन्यात तालुकास्तरावर घेण्यात येणाऱ्या सर्व सभांवर तलाठी व मंडळ अधिकारी बहिष्कार घालतील, असा इशाराही दिला आहे.
निवेदन देतेवेळी विदर्भ पटवारी संघाचे जिल्हा सचिव जे.एच. गेडाम, उपविभागीय सचिव देशमुख, तालुका सदस्य मदनकर, तलाठी सिडाम, टी.आर. गिऱ्हेपुंजे व तालुक्यातील सर्व तलाठी व मंडळ अधिकारी उपस्थित होते. (तालुका प्रतिनिधी)