मकरधोकडा येथे मंडई उत्सव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2021 05:53 IST2021-01-08T05:53:42+5:302021-01-08T05:53:42+5:30

भंडारा : मकरधोकडा येथे नववर्षानिमित्त मंडईचा कार्यक्रम घेण्यात आला. उद्घाटनप्रसंगी आदर्श युवा मंचचे अध्यक्ष संस्थापक पवन मस्के यांनी ...

Mandai festival at Makardhokada | मकरधोकडा येथे मंडई उत्सव

मकरधोकडा येथे मंडई उत्सव

भंडारा : मकरधोकडा येथे नववर्षानिमित्त मंडईचा कार्यक्रम घेण्यात आला. उद्घाटनप्रसंगी आदर्श युवा मंचचे अध्यक्ष संस्थापक पवन मस्के यांनी कार्यक्रमात आज असलेल्या पोलीस वर्धमान दिनाबद्दल पोलीस कर्मचारी अधिकारी यांचे महत्त्व पटवून दिले. त्यांच्या अहोरात्र कामगिरीमुळे त्यांची प्रशंसादेखील केली.

याप्रसंगी सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या शिक्षणाबद्दल जागृतीवर मार्गदर्शन करण्यात आले. यावेळी आदर्श युवा मंच अध्यक्ष पवन मस्के, नरेश डाहारे, दयानंद नखाते, नितीन तुमाने, संजय लांजेवार, सुभाष वाघमारे, ईश्वर कळंबे, जगनाडे, ढवळे अतकरी, सुनील टेंभुर्णी, लुकेश जोध, स्वप्निल जांभूळकर सौरभ साखरकर आदी मान्यवर उपस्थित होते. एकलव्य पंचकमिटी मकरधोकडा जुने यांच्या वतीने विनोद बन्सोड, रमण भुरे, विनायक खंगार, छोटू भुरे आदींनी सहकार्य केले.

Web Title: Mandai festival at Makardhokada