आयसीटी कर्मचाऱ्यांना कायम करा
By Admin | Updated: July 29, 2016 00:39 IST2016-07-29T00:39:39+5:302016-07-29T00:39:39+5:30
आयसीटी योजने अंतर्गत कार्यरत संगणक निर्देशक व शिक्षकांसाठी पद निर्माण करून त्यांना कायम करण्यात यावे, ...

आयसीटी कर्मचाऱ्यांना कायम करा
जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन : संघटनेने दिला आंदोलनाचा इशारा
भंडारा : आयसीटी योजने अंतर्गत कार्यरत संगणक निर्देशक व शिक्षकांसाठी पद निर्माण करून त्यांना कायम करण्यात यावे, या मागणीला घेवून भारतीय विद्यार्थी, भारतीय युवा मोर्चा व भारतीय बेरोजगार मोर्चा यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले.
निवेदनात नमूद केल्याप्रमाणे इतर राज्यातील संगणक शिक्षकांना माध्यमिक शिक्षकांप्रमाणे पद निर्माण करून कायम करण्याचा निर्णय घेण्यात यावा, आयसीटी योजना टप्पा दोन मधील कार्यरत अडीच हजार संगणक शिक्षक बेरोजगार होणार आहेत. तसेच विद्यार्थी संगणक ज्ञानापासून वंचित राहणार आहे. या संगणक निर्देशक व शिक्षकांबाबत त्वरीत निर्णय घेण्यात यावा, आयसीटी योजनेतील टप्पा तीन मधील संगणक निर्देशक, शिक्षकांना पाच वर्षांसाठी निमणूका देण्याऐवजी त्यांना कायम करण्यात यावे, टप्पा चारच्या व्यवस्थीत अंमलबजावणीसाठी व शैक्षणिक विकासासाठी या योजनेचे सुत्र खाजगी कंपन्यांकडे न देता राष्ट्रीय माध्यमिक शिक्षा अभियानाकडे देण्यात यावे, कंपन्यांना मार्गदर्शक संगणक निर्देशक व शिक्षकांना करारानुसार वेतन व वाढीव वेतन देण्याची सूचना देण्यात यावी, कपात करण्यात आलेला भविष्यनिर्वाह निधी खात्यावर जमा करण्यात यावा आणि याबाबतची अंमलबजावणी न करणाऱ्या कंपन्यांची चौकशी करून फौजदारी खटले दाखल करण्यात यावे, प्रचलीत कायद्याप्रमाणे व तरतुदीनुसार महिला शिक्षकांना प्रसुती रजा देण्यात यावी, आयसीटी योजनेत कंपनीने केलेल्या भ्रष्टाचाराची चौकशी समितीमार्फत करण्यात यावी, आदी मागण्यांचा समावेश निवेदनात करण्यात आला आहे.
मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकारी यांना देण्यात आले. यावेळी भारतीय विद्यार्थी मोर्चा भंडारा शाखेचे मंगेश खोब्रागडे, गिरीष वालकर, चेतन बोरकर, प्रभुद्ध रामटेके, रोहित गणवीर, करिश्मा नागदेवे, पायल नागदेवे, सरीता रहांगडाले, कांचन ब्राम्हणकर, निशा वंजारी, मिनल कोरे, सुशांत मेश्राम आदी उपस्थित होते. (प्रतिनिधी)