आवडीच्या क्षेत्रातच भविष्य घडवा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 21, 2018 22:11 IST2018-02-21T22:11:16+5:302018-02-21T22:11:40+5:30
यश आणि अपयश या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. स्पर्धा परीक्षेचे युग असल्याने त्याला सामोरे जाताना अपयशही येते. याला न डगमगता सर्वांनी यश मिळविण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्टा करावी, आवडीच्या क्षेत्रातच प्रवेश घेवून आयुष्य घडवावे, असे प्रतिपादन आ. बाळा काशिवार यांनी व्यक्त केले.

आवडीच्या क्षेत्रातच भविष्य घडवा
आॅनलाईन लोकमत
साकोली : यश आणि अपयश या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. स्पर्धा परीक्षेचे युग असल्याने त्याला सामोरे जाताना अपयशही येते. याला न डगमगता सर्वांनी यश मिळविण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्टा करावी, आवडीच्या क्षेत्रातच प्रवेश घेवून आयुष्य घडवावे, असे प्रतिपादन आ. बाळा काशिवार यांनी व्यक्त केले.
जिल्हा क्रीडा अधिकारी व तालुका क्रीडा संकुल समितीच्या वतीने आयोजित स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी ते बोलत होते. कार्यक्रमाला जिल्हा क्रीडा अधिकारी भाग्यश्री बिले, उपविभागीय अधिकारी अर्चना मोरे, तहसीलदार अरविंद हिंगे, तालुका क्रीडा संकुल समिती कार्याध्यक्ष शाहीर कुरैशी आदी उपस्थित होते.
याप्रसंगी अर्चना मोरे यांनी सर्वांनी आयुष्याचे ध्येय निश्चित करावे व त्या दृष्टीने वाटचाल करावी, प्रत्येकाची अभ्यास करण्याची पद्धत वेगळी असते. मोबाईलचा सकारात्मक वापर केला तर आयुष्य घडते. स्पर्धा परीक्षेत अपयश आल्यास खचून न जाता नव्या उमेदिने त्याला सामोरे जावे, असे प्रतिपादन केले. संचालन अनिराम मरस्कोल्हे यांनी केले. प्रास्ताविक भोजराज चौधरी यांनी केले. तर आभार शाहीर कुरैशी यांनी मानले.