पशुपालनातून आर्थिक प्रगती करा

By Admin | Updated: February 20, 2017 00:19 IST2017-02-20T00:19:53+5:302017-02-20T00:19:53+5:30

जिल्ह्यातील शेतकऱ्यांना अनेकदा संकटाचा सामना करावा लागतो. जिल्ह्यातील शेतकऱ्यांचा मुख्य व्यवसाय शेती असला तरी याला जोड म्हणून बहुतांश शेतकरी दुग्ध व्यवसायातून कुटूंबाचा उदरनिर्वाह करीत आहेत.

Make economic progress from animal husbandry | पशुपालनातून आर्थिक प्रगती करा

पशुपालनातून आर्थिक प्रगती करा

एल. पी. देशमुख यांचे आवाहन : माडगीत संकरीत वासरांचा मेळावा
भंडारा : जिल्ह्यातील शेतकऱ्यांना अनेकदा संकटाचा सामना करावा लागतो. जिल्ह्यातील शेतकऱ्यांचा मुख्य व्यवसाय शेती असला तरी याला जोड म्हणून बहुतांश शेतकरी दुग्ध व्यवसायातून कुटूंबाचा उदरनिर्वाह करीत आहेत. शेतकरी, गोपालकाकांचे जिवनमान उंचावण्यासाठी शासनातर्फे विविध योजना राबविण्यात येत आहे. पशुपालनातून आर्थिक प्रगती करण्यासाठी योजनांचा लाभ घ्यावा, असे आवाहन पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. एल. पी. देशमुख (मिसार) यांनी केले.
राज्यस्तरीय पशुवैद्यकिय दवाखाना श्रेणी -१ खुटसावरी मार्फत कामधेनू दत्तक ग्राम योजनेअंतर्गत मौजा माडगी (टेकेपार) येथे संकरीत वासरांचा मेळावा व दुग्धस्पर्धेचे आयोजन करण्यात आले. त्याप्रसंगी त्या बोलत होत्या.
उद्घाटन साकोली विभागाचे सहायक आयुक्त डॉ. वंजारी यांच्या हस्ते करण्यात आले. अध्यक्षस्थानी सरपंचा हेमलता ढोणे होते. प्रमुख पाहुणे पशुपालक मंडळाचे अध्यक्ष दुधराम बोरीकर, उपाध्यक्ष विलास वाढीवे आदी उपस्थित होते. प्रास्ताविक डॉ. देशमुख यांनी केले. त्या म्हणाल्या, कामधेनू दत्तक ग्राम योजनेचा मुख्य उद्देश निवडलेल्या गावातील पशुधनाचा सर्वांगीण विकास करणे हा होय. ही योजना १२ विविध टप्प्यामध्ये राबविली गेली. जसे जंतनिर्मूलन, गोचिड निर्मूलन, वंधत्व निवारण शिबिर, वैरण विकास कार्यक्रम, पशुपालकांची शैक्षणिक सहल, निकृष्ठ चारा सकस करणे, मलमुत्र व टाकाऊ चाऱ्यांचे खत व्यवस्थापन करणे व अझोला प्रात्याक्षिके करुन दाखविली. डॉ. वंजारी यांनी पशुपालकांना पारंपारिक पध्दतीने पशुपालन न करता आधुनिक पध्दतीने पशुपालन करण्यावर विशेष भर द्यावा, तसेच हिरवी वैरण जसे मका, ज्वारी ची लागवड करुन मुटघास युनिट तयार करावे, मुक्तसंचार गोठा पध्दतीचा अवलंब करावा याविषयी मार्गदर्शन केले. या मेळाव्यामध्ये एकूण १५० जनावरांची नोंदणी झाली. तज्ज्ञ पशुवैद्यकांनी उत्कृष्ट जनावरांची निवड केली. निवड पशुपालकांना प्रोत्साहनपर बक्षीस वितरीत करण्यात आले. कार्यक्रमासाठी डॉ. समर्थ, डॉ वाढई, डॉ. वाघाडे, डॉ. हेडाऊ, डॉ. राठोड, नन्नावरे, चौधरी, चामलाटे, परिचर मानिक चौधरी, भोयर, माऊले, विशाल दडमल, पंचबुध्दे यांनी सहकार्य केले. (नगर प्रतिनिधी)

Web Title: Make economic progress from animal husbandry

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.