जिल्हा दुष्काळग्रस्त घोषित करा

By Admin | Updated: November 7, 2015 00:33 IST2015-11-07T00:33:45+5:302015-11-07T00:33:45+5:30

निसर्गाच्या वक्रदृष्टीने यावर्षी शेतकरी होरपळला आहे. आता उच्च प्रतीच्या धानाचे पिक लोंबीत असतानाच शेतशिवारातील बांध्यातील धान गोलाकार अवस्थेत तयार झाले आहे.

Make the district declare drought | जिल्हा दुष्काळग्रस्त घोषित करा

जिल्हा दुष्काळग्रस्त घोषित करा

भंडारा : निसर्गाच्या वक्रदृष्टीने यावर्षी शेतकरी होरपळला आहे. आता उच्च प्रतीच्या धानाचे पिक लोंबीत असतानाच शेतशिवारातील बांध्यातील धान गोलाकार अवस्थेत तयार झाले आहे. उभे धानपीक रोगराईमुळे जळल्यागत झाले आहे. उच्च प्रतीच्या धानाचे पिक यावर्षी शेतकऱ्यांच्या हातात येणार की नाही? अशी परिस्थिती शेतकऱ्यांवर आली आहे. भंडारा जिल्हा दुष्काळग्रस्त घोषित करावी, अशी मागणी भंडारा जिल्हा काँग्रेसचे महासचिव प्रेमसागर गणविर यांनी मुख्यमंत्र्यांना पाठविलेल्या निवेदनातून केली आहे.
जिल्ह्यात सर्वाधिक धानाचे पीक घेतल्या जाते. त्यामुळे हलक्या व उच्चप्रतीच्या धानाचे पिक शेतकरी घेत असतात. परंतु या दोन्ही धानाच्या पिकावर विविध प्रकारच्या रोगराईचे सावट निर्माण झाले आहे. आता उभे धानातील शेतपीक तुडतुडा, सावदेवी, गाद, गादमाशी व विविध रोगांनी घेरल्यामुळे धानाच्या बांध्यातील शेतात गोलाकार होवून बुंध्यापासून शेंड्यापर्यंत धानाचे तणिस होताना दिसायला लागली आहे. शेतकऱ्यांनी धानाची रोवणी केल्यापासून आतापर्यंत तीन ते चार वेळा कीटकनाशकांची फवारणी केली आहे. एका एकरसाठी एकवेळ औषधी फवारणी करण्याचा खर्च चार ते पाच हजार रुपयाचा येत असतो. जिल्हा दुष्काळग्रस्त घोषित करावी, अशी मागणी गणविर यांनी केली आहे.

Web Title: Make the district declare drought

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.