वृक्षारोपण करुन पर्यावरणाचे संतुलन जोपासा

By Admin | Updated: November 29, 2014 00:48 IST2014-11-29T00:48:45+5:302014-11-29T00:48:45+5:30

आजच्या युगात वैयक्तिक स्वच्छता, शालेय परिसरातील स्वच्छतेबरोबर दैनंदिन अभ्यास करणे आवश्यक आहे.

Make the balance of the environment by planting trees | वृक्षारोपण करुन पर्यावरणाचे संतुलन जोपासा

वृक्षारोपण करुन पर्यावरणाचे संतुलन जोपासा

भंडारा : आजच्या युगात वैयक्तिक स्वच्छता, शालेय परिसरातील स्वच्छतेबरोबर दैनंदिन अभ्यास करणे आवश्यक आहे. तसेच सामाजिक मुल्य जोपासण्याकरिता वृक्षारोपण करुन पर्यावरणाचे संतुलन जोपासावे, असे प्रतिपादन गटशिक्षणाधिकारी बी. आर. पारधी यांनी केले.
वनवैभव आदिवासी प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक आश्रम शाळा कोका येथे स्वच्छ भारत मिशन कार्यक्रमांतर्गत वृक्षारोपण करताना बोलत होते. अध्यक्षस्थानी विलास केजरकर होते, पाहुणे म्हणून गटशिक्षणाधिकारी बी. आर. पारधी, समीर नवाज, वनवैभव शाळेचे प्राचार्य एन. जी. बुराडे, प्रणिता पाचखेडे, लाल बहादूर शाळेचे शिक्षक विवेक मेश्राम, प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक के. आर. सार्वे, प्रा. एन. आर. गोबाडे, प्रा. ए. आर. मुंगुसमारे, प्रा. के. आर. कहालकर, प्रा. एस. एम. राठोड उपस्थित होते. स्वच्छ भारत मिशन अंतर्गत स्वच्छता व बाल आरोग्य आणि स्वच्छ भारत मिशन अंतर्गत स्वच्छता व बाल अरोग्य आणि स्वच्छ भारत स्वच्छ विद्यालय या विषयावर मार्गदर्शन करुन विद्यालयाच्या प्रांगणावर पुत्रजिवी, औंडाबर, कडूलिंब इत्यादी रोपट्याचे गटशिक्षणाधिकारी बी. आर. पारधी, विलास केजरकर यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले. संचालन प्रा. एस. एम. राठोड यांनी तर आभार प्रा. एन.आर. गोबाडे यांनी मानले. कार्यक्रमाकरिता आर. जी. गोबाडे, डी. डी. दडवे, बी. एम. कापगते, व्ही. वाय, लांजेवार, ओ. एन. कान्हेकर, आवेश खान, डी. डी. कमाने, जे. व्ही. गजबे व विद्यालयातील शिक्षक शिक्षीका व कर्मचाऱ्यांनी विद्यार्थिनीनी सहकार्य केले. (नगर प्रतिनिधी)

Web Title: Make the balance of the environment by planting trees

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.