शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईकरांनो पाणी जपून वापरा! ३० मे पासून ५ टक्के, तर ५ जून पासून १० टक्के पाणी कपात
2
पुण्यात मोठी घडामोड! बड्या असामीला अटक; बिल्डर बाळाच्या ड्रायव्हरला दोन दिवस डांबलेले
3
Arvind Kejriwal : "भाजपामध्ये उत्तराधिकारीवरून भांडण सुरू, मोदींना अमित शाहांना..."; केजरीवालांचा मोठा दावा
4
"इलेक्शन मोडमधून सरकार बाहेर आले असेल..."; दुष्काळावरुन जयंत पाटलांचा सरकारवर निशाणा
5
एस जयशंकर २० मिनिटे रांगेत राहिले, मतदार यादीत नावच नव्हते; मग मतदान कसे केले? 
6
हाताला सलाईन, रुग्णालयाच्या बेडवर झोपलेला दिसला मुनव्वर फारूकी, चाहते चिंतेत
7
Hyundai IPO: दिग्गज कार कंपनी आणणार देशातील सर्वात मोठा IPO, लिस्टिंगचा आहे प्लान
8
१.८३ कोटी महिलांनी टाळले मतदान; आदिवासी मतदारसंघांमध्ये महिला मतांचा टक्का चांगला, शहरी भागात मात्र अनास्थाच 
9
विधानपरिषद निवडणूक: चारपैकी दोन ठिकाणी ठाकरेंनी उमेदवार दिले; पोतनिसांचे तिकीट कापले, विश्वासू शिलेदाराला पुन्हा संधी
10
Success Story : पैशांमुळे सुटलं शिक्षण, स्टेशनवर काढले दिवस; मेहनतीच्या जोरावर उभी केली ₹९२००० कोटींची कंपनी
11
श्रीमंतासाठी वेगळा न्याय, राग येणे साहजिकच; पोर्शे अपघात प्रकरणी प्रसिद्ध वकिलांची प्रतिक्रिया
12
Adani च्या 'या' शेअरची सेन्सेक्स इंडेक्समध्ये एन्ट्री; Wipro ची घेतली जागा, एक्सपर्ट म्हणाले, "खरेदी..."
13
पश्चिम बंगालमध्ये निवडणुकीदरम्यान मारहाण, टीएमसी कार्यकर्ता ठार; भाजपवर आरोप
14
कशा मिळतील ४०० पेक्षा जास्त जागा? मल्लिकार्जुन खरगे यांनी व्यक्त केले आश्चर्य; ‘इंडिया’ला बहुमत मिळण्याचा दावा
15
आता अकरावी, बारावीला इंग्रजीची सक्ती नाही; कोणत्याही दोन भारतीय भाषा निवडता येणार
16
Vicco चे अध्यक्ष यशवंत पेंढारकर यांचं निधन, वयाच्या ८५ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
17
आजचे राशीभविष्य २५ मे २०२४; सकाळी सौख्य व समाधान लाभेल, दुपारी...
18
पोर्शे अपघात प्रकरणा : होय...! पोलिसांकडूनच निष्काळजीपणा झाला; आयुक्तांची कबुली 
19
पुणे पोर्शे अपघात प्रकरण; कारवाईत दिरंगाई, दोन पीआय निलंबित
20
लैलाच्या सावत्र वडिलांना कोर्टाने ठोठावली फाशी; अभिनेत्रीसह सहा जणांची केली होती हत्या

रस्ता बांधकामाचा मुख्य सेवांना फटका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 17, 2018 10:03 PM

शहरातील मुख्य रस्त्याचे सिमेंटीकरणाचे बांधकाम सुरू आहे. जून्या डांबरी रस्त्याचे खोदकाम करताना दूरध्वनी सेवेचे केबल तथा पाणीपुरवठा जलवाहिनी फुटल्याने प्रमुख सेवा विस्कळीत झाल्या आहेत. मागील तीन दिवसांपासून बांधकाम परिसरातील पथदिवेही बंद आहेत. कामे सुरू करतानी संबंधित यंत्रणेने नियोजन येथे केले नाही काय, असा प्रश्न उपस्थित होत आहे.

ठळक मुद्देदूरध्वनी केबलही तुटले : जलवाहिनींची नासधूस, नागरिकांना रहदारीला त्रास

लोकमत न्यूज नेटवर्कतुमसर : शहरातील मुख्य रस्त्याचे सिमेंटीकरणाचे बांधकाम सुरू आहे. जून्या डांबरी रस्त्याचे खोदकाम करताना दूरध्वनी सेवेचे केबल तथा पाणीपुरवठा जलवाहिनी फुटल्याने प्रमुख सेवा विस्कळीत झाल्या आहेत. मागील तीन दिवसांपासून बांधकाम परिसरातील पथदिवेही बंद आहेत. कामे सुरू करतानी संबंधित यंत्रणेने नियोजन येथे केले नाही काय, असा प्रश्न उपस्थित होत आहे.श्रीराम नगरातील रेल्वे फाटकाजवळून सिमेंट रस्ता बांधकामाची कामे प्रगतीपथावर आहेत. ४ कोटी ४० लक्ष किंमतीचा सिमेंट रस्ता बांधकाम सध्या सुरू आहे. जूने डांबरीकरण रस्ता जेसीबीने खोदणे सुरू आहे.रस्त्याच्या शेजारी भूमिगत जलपुरवठा वाहिनी, दुरध्वनी सेवेचे केबल जमिनीत पूरले आहेत. रस्ता बांधकाम करतानी भूमिगत असलेले साहित्यांचे नासधूस झाल्याने महत्वपूर्ण सेवा प्रभावित झाली आहे. परिसरातील बँक आॅफ बडोदा बँकेची दूरध्वनी व इतर सेवा विस्कळीत झाली आहे.रस्त्याच्या दूभाजकावर पथदिवे लावले आहेत. रस्ता बांधकामानंतर पथदिवे बंद स्थितीत आहेत. हा आंतरराज्यीय रस्ता असून दुचाकी तथा चारचाकी वाहने दूभाजकावर आदळण्याची शक्यता नाकारता येत नाही. पादचाऱ्यांनाही त्रास सहन करावा लागत आहे. रात्रीला जड वाहतूक येथून मोठ्या प्रमाणात होत असते.एकेरी वाहतूक सुरू असल्याने वाहनधारकांचा जीव धोक्यात आला आहे. रस्ता निमुळता आहे. दुभाजकामुळे वाहन दुभाजकावर जाण्याची भिती व्यक्त केली जात आहे.रस्ता बांधकाम सुरू करण्यापुर्वी संबंधित विभागाने नियोजनाची येथे गरज होती. नियोजनाचा येथे अभाव दिसून येतो. शहराला बायपास रस्ता नसल्याने वाहतुकीची समस्या रस्ता बांधकामामुळे निर्माण झाली आहे. किमान रात्री पथदिवे सुरू करावे, अशी मागणी श्रीरामनगरवासीयांनी केली आहे.शनिवार व रविवारी रस्त्याचे काम सुरू झाले. दोन दिवस बँक बंद होती. सोमवारी ही बाब निदर्शनास आली. सर्व केबलमध्ये तांत्रिक बिघाड निर्माण झाले आहे. याप्रकरणी बीएसएनएलकडे तक्रार दिली आहे. बँकेच्या कामावर विपरीत परिणाम होत आहे.-नितीन सोनकुसरे,शाखा व्यवस्थापक, बँक आॅफ इंडिया तुमसर.रस्त्याचे काम सुरू असताना भूमिगत पाणीपुरवठा करणारी जलवाहिनी येथे असल्याची माहिती कामे करणाऱ्यांना दिली होती. त्याची काळजी घेवून कामे करायला पाहिजे होती. ती येथे करण्यात आली नाही. त्याचा फटका बसत आहे.-बंडूभाऊ बांडेबुचे,सामाजिक कार्यकर्ता, तुमसर.