पर्यावरण संतुलन राखणे काळाची गरज

By Admin | Updated: August 10, 2015 00:23 IST2015-08-10T00:23:56+5:302015-08-10T00:23:56+5:30

जंगलाचे रक्षण स्थानिक लोकांनी करावे, शिवकालीन बंधारे, पाणी अडवा पाणी जिरवा, जलयुक्त शिवार योजनेची तसेच आदर्श गावाची संकल्पना, ....

Maintaining an environment balance is the need of the hour | पर्यावरण संतुलन राखणे काळाची गरज

पर्यावरण संतुलन राखणे काळाची गरज

दहेगाव दत्तक घेणार : बाळा काशिवार यांचे प्रतिपादन
लाखांदूर : जंगलाचे रक्षण स्थानिक लोकांनी करावे, शिवकालीन बंधारे, पाणी अडवा पाणी जिरवा, जलयुक्त शिवार योजनेची तसेच आदर्श गावाची संकल्पना, जैविक शेतीची माहिती सांगून दहेगाव हे गाव दत्तक घेऊ, असे प्रतिपादन आमदार बाळा काशिवार यांनी केले.
तालुक्यातील दहेगावमध्ये संयुक्त वन व्यवस्थापन समिती योजनेंतर्गत एलपीजी गॅस वितरणाचा कार्यक्रम घेण्यात आला. त्याप्रसंगी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ते बोलत होते. दहेगाव, दांडेगाव, कोच्छी येथील ओबीसी, एस.सी., एस.टी. लाभार्थ्यांना आमदार बाळा काशीवार यांच्या प्रमुख उपस्थितीखाली एलपीजी गॅसचे वाटप करण्यात आले.
प्रमुख अतिथी म्हणून सभापती मंगला बगमारे, जिल्हा परीषद सदस्य रमेश डोंगरे, जिल्हा परिषद सदस्य मनोहर राऊत आदी मान्यवर प्रमुख्याने उपस्थित होते.
यावेळी एलपीजी गॅसचे दहेगाव येथे ६६ दांडेगाव येथे १०, कोच्छी येथे ५३ लाभार्थ्यांना गॅसचे वितरण करण्यात आले. सदर गॅस योजना २५ टक्के अनुदान आणि २५ टक्के शासनाच्या वतीने यानुसार वाटप करण्यात आले. कार्यक्रमाप्रसंगी जिल्हा परीषद सदस्य रमेश डोंगरे, सभापती मंगला कामारे, आमदार बाळा काशीवार यांचा समितीच्या वतीने शाल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी सरपंच संजना कुंभारे, गोपाल पारधी (उपसरपंच), गोसू कुंभारे अध्यक्ष वन व्यवस्थापन समिती श्रीराम कांबळे, रेवाराम देसाई, बी.एस. तडस, वनपरिक्षेत्राधिकारी, तुलाराम डोंगरवार, बाबूराव डोंगरवार, सुनिता कोठोने आदी उपस्थित होते. (तालुका/शहर प्रतिनिधी)

Web Title: Maintaining an environment balance is the need of the hour

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.