स्वच्छता टिकवून ठेवणे सर्वांचीच जबाबदारी

By Admin | Updated: September 1, 2014 23:22 IST2014-09-01T23:22:09+5:302014-09-01T23:22:09+5:30

ग्लोबल वार्मिंग, पर्यावरण प्रदूषण देश व समाजापुढे मोठे आव्हान आहे. पर्यावरणाचे संरक्षण करणे गरजेचे झाले आहे. पर्यावरण संरक्षणाचे हे काम कुण्या एका संस्थेचे किंवा प्रशासनाचे नव्हे तर सर्वांचे आहे.

Maintaining cleanliness is the responsibility of all | स्वच्छता टिकवून ठेवणे सर्वांचीच जबाबदारी

स्वच्छता टिकवून ठेवणे सर्वांचीच जबाबदारी

भंडारा : ग्लोबल वार्मिंग, पर्यावरण प्रदूषण देश व समाजापुढे मोठे आव्हान आहे. पर्यावरणाचे संरक्षण करणे गरजेचे झाले आहे. पर्यावरण संरक्षणाचे हे काम कुण्या एका संस्थेचे किंवा प्रशासनाचे नव्हे तर सर्वांचे आहे. प्रत्येक नागरिकांची ही जबाबदारी आहे. पालिकेतर्फे शहराची स्वच्छता व सौंदर्यीकरणाकरिता लवकरच कामे घेण्यात येणार असून याकरिता नागरिकांचेही सहकार्य आवश्यक आहे, असे आवाहन नगराध्यक्ष बाबूराव बागडे यांनी केले.
शहर सौंदर्यीकरण, पर्यावरण संतुलनच्या दृष्टीकोांतून ग्रीन हेरीटेज पर्यावरण संस्था व छावा संग्राम परिषद (अल्पसंख्यंक सेल), शाखा भंडाराच्या संयुक्त विद्यमाने मुस्लीम लायब्रेरी चौक येथे आयोजित वृक्षारोपण कार्यक्रमात ते बोलत होते.
यावेळी सामाजिक वनीकरणाचे लागवड अधिकारी एन.आर. सार्वे, ओबीसी संग्राम परिषदचे अध्यक्ष देवेंद्र गावंडे, मकसूद पटेल, ग्रीन हेरिटेज संस्थेचे अध्यक्ष सईद शेख, मिलिंद मदनकर, इंद्रजीत येळणे, छावा आौटो संघटनाचे अध्यक्ष शिवा गायधने, भंडारा शहर संघर्ष समितीचे अध्यक्ष भय्यालाल साकुरे, देवीदास कुंभलकर, सतीश सार्वे, बबलू बाळबुधे, बाबा पाठेकर, दीपक कुंभलकर, गोलू लांजेवार, राधेश्याम पारधी उपस्थित होते. नवनिर्वाचित नगराध्यक्ष बाबू बागडे यांच्या हस्ते फाल्गुणराव पटोले यांचे स्मृतीप्रित्यर्थ ही झाडे लावण्यात आले. चौकातील दुकानदारांनी झाडांच्या संगोपनाची जबाबदारी देण्यात आली. शहरात लवकरच विविध संस्था, नगरपरिषदेच्यावतीने १,००० झाडे लावण्यात येणार आहे.
प्रास्ताविक व संचालन मकसूद पटेल यांनी केले. यावेळी सईद शेख म्हणाले, शहर व परिसराचे पर्यावरण संरक्षण करण्याची सुरुवात झाली असून सर्वांच्या सामुहिक प्रयत्नातूनच पर्यावरणाचे खरोखर संरक्षण साध्य होऊ शकेल, भंडारा शहर प्रदुषणमुक्त करण्यासाठी सर्वांनी समोर येण्याची गरज आहे. प्रत्येकाने एक झाड लावून त्यांचे संवर्धन केले तरीसुद्धा हे शहर हिरवे होऊ शकते. झाडे लावण्यात सर्वच समोर असतात परंतु ही झाडे जगविण्यासाठी मात्र कुणीही प्रयत्नशील नाहीत. त्यामुळे सर्वांनी एक होऊन झाडे जगविण्यासाठी पुढे यावे, असे आवाहनही सईद शेख यांनी केले. कार्यक्रमासाठी जुनैद अख्तर, सैय्यद बब्बूभाई, मुश्ताक, जावेद शेख, मोरु मते, अरफात खान, इरफान खान, अरविंद ढोमणे, शब्बीर सिद्धीकी, संजय पटले, लोकेश शहारे, एन.शिरभाते, सोहेल खान यांच्यासह छावा संग्राम परिषदेच्या पदाधिकाऱ्यांनी सहकार्य केले. (प्रतिनिधी)

Web Title: Maintaining cleanliness is the responsibility of all

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.