जातीय सलोखा कायम ठेवा
By Admin | Updated: August 11, 2014 23:45 IST2014-08-11T23:45:16+5:302014-08-11T23:45:16+5:30
जात, धर्म, पंथांचे लोक जिल्ह्यात मिळून राहतात. ते सामाजिक एकोप्याने सर्व धर्मीयांचे सण साजरे करतात. परंतु काही असामाजिक व विघटणकारी कृत्य करणारे व्यक्ती हे सामाजिक एकता भंग करतात.

जातीय सलोखा कायम ठेवा
भंडारा : जात, धर्म, पंथांचे लोक जिल्ह्यात मिळून राहतात. ते सामाजिक एकोप्याने सर्व धर्मीयांचे सण साजरे करतात. परंतु काही असामाजिक व विघटणकारी कृत्य करणारे व्यक्ती हे सामाजिक एकता भंग करतात. अशा असामाजिक कृत्य करणाऱ्या व्यक्ती पासून सावध राहून आपली एकता भंग होणार नाही याची दक्षता घ्यावी, तसेच जिल्ह्यात जातीय सलोखा कायम ठेवावा, असे आवाहन जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा वंदना वंजारी यांनी केली. जिल्हास्तरीय जातीय सलोखा समितीची बैठक पोलीस मुख्यालयाच्या बहुउद्देशीय सभागृहात आयोजित करण्यात आली होती. त्यावेळी बोलत होत्या. अध्यक्षस्थानी जिल्हाधिकारी डॉ.माधवी खोडे, समितीचे सदस्य सचिव पोलीस अधिक्षक कैलास कणसे, तहसीलदार सुशांत बनसोडे, जिल्ह्यात जातीय सलोखा समितीचे सदस्य उपस्थित होते.
यावेळी जिल्हाधिकारी डॉ.माधवी खोडे म्हणाल्या, देशाला स्वातंत्र्य मिळून ६७ वर्षे झाली असून सुद्धा जातीय सलोख्याचा प्रश्न नेहमी उद्धवत असतो. त्यासाठी जनतेनी आपली मानसिकता बदलविणे आवश्यक आहे. तसेच सामाजिक बांधिलकीची भावना कायम ठेवणे जरूरीचे आहे. सद्सद विवेक बुद्धीचा अंगिकार करावा, सोशल मिडीयाद्वारे होत असलेल्या अफवावंर विश्वास ठेवू नये, शितला माता मंदिर घटनेबाबतची पुनरावृत्ती होवू नये याची दक्षता घ्यावी.
‘एकमेका सहाय्य करू अवघे धरू सुपंथ’ या म्हणी प्रमाणे आपले वागणे असावे. समितीच्या सदस्यांनी केलेल्या सूचनेनुसार सप्टेंबर पासूनदर लोकशाही दिनाच्या कार्यक्रमानंतर जातीय सलोखा समितीच्या बैठकीचे आयोजन करण्यात येईल, असेही त्याम्हणाल्या. उपस्थितांनी केलेल्या सुचनेनुसार लवकरच अवैध दारू विक्रीबाबात सलोख चौकशी करून त्यात दोषी असणाऱ्यांवर कडक कारवाई करण्यात येईल व त्यावर योग्य ती उपाययोजना करण्यात येईल. जातीय सलोखा समिीची सभा नियमित दरमहा घेण्यात येईल.
शितला माता मंदिराबाबत कायदेशिर सखोल सल्ला घेवून त्यावर पोलीस व जिल्हा प्रशासनातर्फे कारवाई करण्यात येईल. तसेच सोशल मिडीयावर जे व्यक्ती असामाजिक कृत्य करतात त्याघटकांवर कडक नजर ठेवून कारवाई करण्यात येईल, असे जिल्हा पोलीस अधिक्षक कैलास कणसे यांनी यावेळी सांगितले. या बैठकीत सामाजिक संघटनांच्या प्रतिनिधीनी मनोगत व्यक्त करून सूचना केल्या. प्रास्ताविक व संचालन उपविभागीय पोलीस अधिकारी हिम्मत जाधव यांनी तर आभार उपविभागीय पोलीस अधिकारी तुमसर आनंद भोईटे यांनी मानले. (प्रतिनिधी)