साकोली तालुक्यात ३३ ग्रामपंचायतीवर महिलाराज
By Admin | Updated: June 19, 2015 00:58 IST2015-06-19T00:58:44+5:302015-06-19T00:58:44+5:30
आगामी होणाऱ्या साकोली तालुक्यातील ६३ ग्रामपंचायतीच्या सरपंचाचे आरक्षण आज दुपारी तहसिल कार्यालय साकोली येथे ....

साकोली तालुक्यात ३३ ग्रामपंचायतीवर महिलाराज
साकोली : आगामी होणाऱ्या साकोली तालुक्यातील ६३ ग्रामपंचायतीच्या सरपंचाचे आरक्षण आज दुपारी तहसिल कार्यालय साकोली येथे तहसिलदार डॉ. हंसा मोहने, नायब तहसिलदार दिनकर खोत, अव्वल कारकुन ए. आर. वाढीवे यांच्या उपस्थितीत कटकवार विद्यालयाच्या विद्यार्थी विश्वास थुलकर यांच्या हस्ते सोडत पध्दतीने काढण्यात आली. यात साकोली तालुक्यातील ३३ ग्रामपंचायतीवर महिला सरपंचाची वर्णी लागली आहे.
या आरक्षणानुसार ग्रामपंचायत चांदोरी अनसूचित जाती महिला, लवारी अनुसूचित जाती महिला, मोहघाटा अनुसूचित जाती महिला, उकारा अनुसूचित जाती महिला, सोनपुरी अनुसूचित जाती महिला, जांभळी अनुसूचित जाती महिला, बोरगांव अनुसूचित जाती सर्वसाधारण, मालुटोला अनुसूचित जाती सर्वसाधारण, कटंगधरा अनुसूचित जाती सर्वसाधारण, झाडगाव अनुसूचित जाती सर्वसाधारण, आमगाव (बु) अनुसूचित जाती सर्वसाधारण, ग्रामपंचायत परसोडी अनुसूचित जमाती महिला, चारगांव अनुसूचित जमाती सर्वसाधारण, खैरी अनुसूचित जमाती सर्वसाधारण, सानगडी अनुसूचित जमाती महिला, तुडमापुरी अनुसूचित जमाती महिला, पाथरी अनुसूचित जमाती महिला, उमरझरी अनुसूचित जमाती सर्वसाधारण, ग्रामपंचायत किन्ही एकोडी नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला, बाम्पेवाडा नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला, पिंडकेपार नागरीकांचा मागास प्रवर्ग महिला, खांबा नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला, बोदरा नागरीकांचा मागास प्रवर्ग, परसटोला नागरिकांचा मागास प्रवर्ग सर्वसाधारण, बाम्हणी नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला, वांगी नागरिकांचा मागास प्रवर्ग सर्वसाधारण, पापडा (बु.) नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला, सासरा नागरिकांचा मागास प्रवर्ग सर्वसाधारण, विहिरगांव नागरिकांचा मागास प्रवर्ग सर्वसाधारण, शिवणीबांध नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला, साखरा नागरिकांचा मागास प्रवर्ग सर्वसाधारण, सिरेगांवटोला नागरिकांचा मागास प्रवर्ग सर्वसाधारण, सुकळी नागरिकांचा मागास प्रवर्ग सर्वसाधारण, महालगांव नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला, धर्मापुरी नागरिकांचा मागास प्रवर्ग सर्वसाधारण, ग्रामपंचायत एकोडी सर्वसाधारण स्त्री, उसगांव सर्वसाधारण स्त्री, पळसपाणी सर्वसाधारण, धानोड सर्वसाधारण स्त्री, वडेगांव सर्वसाधारण स्त्री, जांभळी खांबा सर्वसाधारण स्त्री, किन्ही सर्वसाधारण, सातलवाडा सर्वसाधारण, मोखे सर्वसाधारण स्त्री, गुढरी सर्वसाधारण, विर्शी सर्वसाधारण, सेदुरवाफा सर्वसाधारण स्त्री, उमरी सर्वसाधारण, मुंडीपार सर्वसाधारण, गिरोला सर्वसाधारण, बरडकिन्ही सर्वसाधारण स्त्री, गोंडउमरी सर्वसाधारण, बोळदे सर्वसाधारण, पळसपाण सर्वसाधारण स्त्री, निलज सर्वसाधारण, सोनेगांव सर्वसाधारण, सालेबर्डी सर्वसाधारण स्त्री, केसलवाडा सर्वसाधारण स्त्री, वडद सर्वसाधारण स्त्री, कुंभली सर्वसाधारण स्त्री, खंडाळा सर्वसाधारण, बोंडे सर्वसाधारण स्त्री व सावरबंद सर्वसाधारण प्रवर्ग असे आरक्षण जाहिर करण्यात आले.
(तालुका प्रतिनिधी)