महात्मा गांधी-शास्त्रीजींना आदरांजली

By Admin | Updated: October 4, 2015 01:32 IST2015-10-04T01:32:08+5:302015-10-04T01:32:08+5:30

राष्ट्रपिता महात्मा गांधी आणि जय जवान जय किसानचा मंत्र देणारे लालबहाद्दूर शास्त्री यांची जयंती भंडारा जिल्ह्यातील शाळा, ....

Mahatma Gandhi-Shastriji respected | महात्मा गांधी-शास्त्रीजींना आदरांजली

महात्मा गांधी-शास्त्रीजींना आदरांजली


भंडारा : राष्ट्रपिता महात्मा गांधी आणि जय जवान जय किसानचा मंत्र देणारे लालबहाद्दूर शास्त्री यांची जयंती भंडारा जिल्ह्यातील शाळा, महाविद्यालयात विविध कार्यक्रम घेऊन आणि ग्रामसफाई मोहीम राबवून साजरी करण्यात आली. याशिवाय सामाजिक संघटना शासकीय कार्यालये आणि गैरशासकीय कार्यालयातही जयंती साजरी करण्यात आली.
जिल्हा प्रशासनातर्फे आदरांजली
भंडारा : जिल्हा प्रशासनाच्यावतीने महात्मा गांधी जयंती व लालबहादुर शास्त्री जयंती जिल्हाधिकारी कार्यालयात साजरी करण्यात आली. जिल्हाधिकारी धीरजकुमार यांनी आदराजंली दिली. यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी प्रविण महाजन, उपजिल्हाधिकारी विजया बनकर, पुरवठा अधिकारी अनिल बनसोड उपस्थित होते.
टाकळी ग्रामपंचायत
भंडारा : टाकळी ग्रामपंचायतमध्ये कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सरपंच वसंता ईश्वरकर होते. यावेळी परमात्मा एक सेवक मंडळाचे मन्साराम सार्वे, कृषी सहायक एस.डी. भोंगाडे, अजित गजभिये, उपसरपंच शिवराम भुते, ग्रामपंचायत सदस्य उर्मिला सार्वे, अश्विनी बोरकर, वसंता उके उपस्थित होते. यावेळी स्वच्छता मोहीमेबाबत माहिती देण्यात आली. यावेळी जयगोपाल गजभिये, ईश्वर लुटे, फुलचूर गलबले, अनिल कुथे, सुजीत गजभिये, संतोष सार्वे, संदीप वैद्य, चांगेश्वर मते, सहसराम सार्वे, महादेव टाले, विजय गजभिये, विनोद बुरडे उपस्थित होते. संचालन सचिव बी.जी. तांबळे यांनी तर आभारप्रदर्शन राजेश गजभिये यांनी केले.
मानेगाव (सडक)
लाखनी: मानेगाव (सडक) येथे नेहरू युवा केंद्राच्या शाखा मानेगाव (सडक) च्यावतीने ग्रामपंचायत कार्यालयात जयंती साजरी करण्यात आली. यावेळी संपूर्ण गावाची साफसफाई करुन ग्राम स्वछता अभियान राबविण्यात आले. गावामध्ये स्वछतेचा संदेश देणारी दिंडी काढण्यात आली. कार्यक्रमाच्या अघ्यक्षस्थानी प्रा.अशोक चेटुले होते. अतिथी म्हणून माजी सरपंच हारिदास पाटिल गायधनी हे होते. पाहुणे म्हणून नरेंद्र भांडारकर, छाया मेंढ, शितल भांडारकर, नलिनी पाखमोडे, प्रा.निवृत्ती भांडारकर, मंजुषा मेश्राम उपस्थित होते. संचालन संदीप भांडारकर यांनी तर आभारप्रदर्शन सचिन चेटुले यांनी केले. कार्यक्रमासाठी मंडळाचे सदस्य जितेंद्र भांडारकर, पंकज चेटुले, विजय डूंब्रे, निखिल सिंगनजुडे, मुकेश भांडारकर, जगदीश चेटुले, दिगंबर सेलोकर, तुषार सिंगनजुडे, गणेश कुंभलवार, सौरभ सिंगनजुडे, शैलेश कांबळे यांनी सहकार्य केले
शिवराम विद्यालय भंडारा
भंडारा : संत शिवराम विद्यालयात कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मुख्याध्यापक देवचंद चौधरी होते. प्रमुख अतिथी म्हणून रजनी सेलोकर होते. याप्रसंगी विद्यार्थ्यांनी भाषण दिले. विद्यार्थ्यांसाठी निबंध स्पर्धा, चित्रकला स्पर्धा, वर्ग सजावट व शालेय परिसर स्वच्छता असे विविध उपक्रम घेण्यात आले. यशस्वी विद्यार्थ्यांना बक्षीस देण्यात आले. संचालन रंजना भिवगडे यांनी तर आभारप्रदर्शन माधवी चिखलीकर यांनी केले.
सुबोध विद्यालय मासळ
मासळ : येथील सुबोध विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी गावातून स्वच्छता रॅली काढली. विद्यार्थ्यांनी शिवाजी चौक झाडूने स्वच्छ केला. यावेळी प्राचार्य जी.एन. टिचकुले यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थी व शिक्षक ग्रामस्वच्छता अभियानात सहभागी झाले. यानंतर शालेय परिसरातील कचरा गोळा करुन जाळण्यात आला. प्राचार्य जी.एन. टिचकुले यांच्या अध्यक्षतेखाली कार्यक्रम घेण्यात आला. यावेळी विद्यार्थ्यांनी विविध कार्यक्रम सादर केली. यात स्नेहल राऊ त, तृप्ती चावरे, अंकित नवघडे, धिरज वाटकर, साहिल चेटूले, सागर तरोणे, निराशा गोंधुळे, वैष्णवी चुटे, शेजल चुटे, निगम बावणे, समिक्षा राखडे, वैभव फुंडे, सोनाली बोरकर या विद्यार्थ्यांनी गांधीजी व शास्त्रीजींच्या जीवनावर भाषणे दिली. थालीशा माटे, साक्षी राऊ त, प्रिया काटेखाये, अर्पिता चहांदे, दिपा नगरकर यांनी नृत्य सादर केले.
सत्यसाई महाविद्यालय
जवाहरनगर : ओम सत्यवाई कला व विज्ञान महाविद्यालयात कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रा. दर्शना गिरडे या होत्या. पाहुणे म्हणून प्रा. वर्षा भुरे, सांस्कृतिक विभागप्रमुख प्रा. आशा कांबळे, रासेयो कार्यक्रम अधिकारी प्रा. प्रतिक घुले उपस्थित होते. प्रा. वर्षा भुरे यांनी महात्मा गांधी व लालबहादूर शास्त्री यांच्या जीवन कार्याबद्दल माहिती दिली. आशा कांबळे यांनी त्यांचे विचार आत्मसात करुन वागले पाहिजे असे म्हटले. संचालन विराज हारोडे यांनी तर आभारप्रदर्शन पायल लांडगे हिने केले. यावेळी प्रा. सुप्रिया हटवार प्रा. शेख, प्रा. मोथा्रकर, प्रा. प्रीती बागडे, प्रा. चंद्रमुणी रंगारी, प्रा. मनीषा जांभुळकर, प्रा. प्रीती राऊ त, प्रा. रुपाली रामटेके, प्रा. वर्षा दंढारे उपस्थित होते.
प्राथमिक शाळा, राजेगाव
भंडारा : राजेगांव (एमआयडीसी) येथील जिल्हा परिषदा प्राथमिक शाळेत कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी अर्चना शेंडे होत्या. अतिथी म्हणून उपसरपंच सुनील सार्वे व समितीचे पदाधिकारी व ग्रामपंचायत सदस्य उपस्थित होते. याप्रसंगी पाहुण्यांनी जीवनावर माहिती दिली. स्वच्छता पंधरवडा सुरु करण्याचे व सहभागी होण्याचे निर्देश देण्यात आले.
बजरंग दल, कोसरा
चिचाळ : बजरंग दल शाखा कोसराच्यावतीने आयोजित कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हा सहयोजक तिलक वैद्ये होते. अतिथी म्हणून पंचायत समिती सदस्या कल्पना गभणे, वसंता गंथाळे, धनराज जिभकाटे, विजय काटेखाये, मनिष आचार्य, प्रतिक कडू, लोकेश गभणे, राकेश सेलोकर, मनिष चुटे व ग्रामपंचायत सदस्य उपस्थित होते. या कार्यक्रमांतर्गत दलाच्या कार्यकर्त्यांनी ग्रामसफाई केली. या कार्यक्रमाला सुरज गभणे, चंदू नेवारे व बजरंग दल कार्यकर्त्यांनी सहकार्य केले.
नूतन कन्या शाळा
भंडारा : नूतन कन्या शाळेत आयोजित कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शासकीय अध्यापक महाविद्यालयाच्या प्राध्यापिका लाडे होत्या. अतिथी म्हणून प्राचार्या शीला भुरे, पर्यवेक्षिका नंदा नासरे, सीमा चित्रीव, प्रमुख वक्त्या म्हणून विभा नानोटी व रोशनी पवार उपस्थित होते. संचालन आंकाक्षा भोवते व ऋतुजा गिऱ्हेपुंजे हिने तर आभारप्रदर्शन साक्षी वंजारी हिने केले.
पब्लिक स्कूल, मानेगाव
लाखनी : एम पब्लिक स्कुल मानेगाव येथे दे दी हमें आझादी बिना खडग बिना ढाल या समूहगीताने कार्यक्रमाला प्रारंभ झाला. मुख्याध्यापिका नंदेश्वर यांनी स्वावलंबी बनो स्वावलंबन व्यक्ति, समाज तथा राष्ट्रासाठी ताकद, गौरव और उन्नतीचा मार्ग आहे. आळस, भय, कायरता आणि संकोच समाप्त करुन आत्मविश्वास निर्माण करा, सत्य, अहिंसा आणि शांतीच्या मार्गाने चला असे आवाहन केले. स्वच्छता अभियान शालेय परिसरात राबविण्यात आले. संचालन राखी डडमल तर आभारप्रदर्शन संगिता हटवार यांनी केले. कार्यक्रमासाठी रेहपाडे, बर्वे, खंडारे, डडेमल, हटवार, सुखदेवे यांनी सहकार्य केले.
लोक विद्यालय पांढराबोडी
भंडारा : लोक विद्यालय पांढराबोडी येथे आयोजित कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मुख्याध्यापक पी.ए.बागडे होते. पाहुणे म्हणून ए.एस. कान्हेकर, सी.एफ. बागडे, वाय.डी. गजभिये, डी.के. चव्हान, बी.एच.धांडे, झंझाड, भोवते उपस्थित होते. यावेळी अतिथींनी महात्मा गांधी व लालबहादूर शास्त्री यांच्या जीवनाविषयी मार्गदर्शन केले.
विनोद विद्यालय टेकेपार
भंडारा : विनोद विद्यालय टेकेपार येथे आयोजित कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मुख्याध्यापक एच.पी. लांजेवार हे होते. यावेळी पर्यवेक्षक एस.पी. काटेखाये, अनिलकुमार भुरे उपस्थित होते. संचालन रश्मी हुमणे हिने केले तर आभार प्रणाली मेश्राम हिने मानले.
इंदुताई विद्यालय वायगाव
मोहाडी : इंदुताई हायस्कुल वायगाव येथे आयोजित कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मुख्याध्यापक व्ही. एम. बागडे होते. म्हणून वरिष्ठ शिक्षक पी.एन. लोहकरे, पी. एस. मुरुतकर, राजविलास मेश्राम, एस.बी. कटरे, एस.एम. बाबुलकर, के.एस. फुलके उपस्थित होते. अतिथींनी महात्मा गांधी व लालबहादूर शास्त्री यांच्या जीवनचरित्रावर मार्गदर्शन केले. यावेळी विद्यार्थ्यांनी सांस्कृतिक कार्यक्रमाच्या माध्यमातून गीतांचे सादरीकरण केले. संचालन आर.एस. मेश्राम यांनी तर आभारप्रदर्शन प्राची राखडे यांनी केले.
जि. प. शाळा सितेपार
मोहाडी : जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, सितेपार (झं.) येथे कार्यक्रमाला शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष नंदू झंजाळ, सरपंच प्रितलाल गजभिये, उपसरपंच टिकाराम ठवकर, माजी सरपंच राजू झंजाळ पाटील, महादेव झंजाळ, ग्यानीराम शहारे, चंद्रशेखर झंजाळ, मुख्याध्यापक किशोर ईश्वरकर, सहाय्यक शिक्षक लांबकाने, ग्रा.प. सदस्य उपस्थित होते. संचालन किशोर ईश्वरकर तर आभारप्रदर्शन लांबकाने यांनी केले.
इंदुताई विद्यालय हरदोली
मोहाडी : इंदुताई विद्यालय हरदोली येथे आयोजित कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मुख्याध्यापक ओ.बी. चोले होते. पाहुणे म्हणून खेमचंद हटवार, अनाथपाल वैद्य, सतिश रामटेके, प्रा. पारधी, प्रा. सिंगनजुडे, प्रा. झोडे, के.टी. देशमुख, टी. बी. मेश्राम, एस. डब्लू, जांभुळकर, नरेश चव्हाण, किशोर शेन्डे उपस्थित होते. संचालन के.एम. हटवार यांनी तर आभारप्रदर्शन प्रा. पारधी यांनी केले.
जि. प. शाळा आसगाव
आसगांव : जिल्हा परिषद हायस्कुल आसगाव यथे कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य बी.बी. बावणे होते. अतिथी म्हणून हाडगे, भुरे व कावळे उपस्थित होते. संचालन मिलन गजभिये हिने केले. आभारप्रदर्शन दिव्या मेंढे या विद्यार्थीनीने केले.
दीपक विद्यालय, रेंगेपार
लाखनी : रेंगेपार (कोठा) येथील दीपक विद्यालयात कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मुख्याध्यापक डी.डी. वासनिक होते. अतिथी म्हणून सुभाष चवडे, एल.के. हलमारे, एम. एस. देशमुख, व्ही.आर. तुमसरे, ए.आर. काडगाये, व्ही. एस. हलमारे, व्ही. एम. हुमने, जे.बी. नलावरे उपस्थित होते.
नेहरु विद्यालय सानगडी
सानगडी : नेहरु विद्यालय सानगडी येथे आयोजित कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य म्हणून उपमुख्याध्यापक पुरुषोत्तम डोमळे होते. यावेळी पर्यवेक्षक दीपक लेदे, सदावत अली सय्यद, सुरपंखा कोचे उपस्थित होते. कार्यक्रमाचे औचित्य साधून ग्रामसफाईचे आयोजन करण्यात आले. विविध सांस्कृतिक कार्यक्रम सादर करण्यात आले. संचालन माणिक खर्डेकर यांनी तर आभारप्रदर्शन अशोक मस्के यांनी केले. कार्यक्रमासाठी नंदेश्वर, बांगडकर, प्रमोद वंजारी, महादेव रंगारी, उत्तरा निमजे, देवराव भांडारकर यांनी सहकार्य केले.
जि. प. शाळा, राजेगाव
लाखनी : जिल्हा परिषद प्राथमिक शाळा राजेगाव येथे कार्यक्रमाला किसन मरसकोले, जगदीश धारणे, भास्कर नागदेवे, सरीता डोंगरवार, हिरकन्या ठाकरे, आशा कनोजे, इंदूताई शेंडे उपस्थित होत्या.
नवनीत विद्यालय खमारी
भंडारा : नवनीत विद्यालय खमारी येथे आयोजित कार्यक्रमाला मुख्याध्यापक नरेंद्र गणवीर, हिरालाल गजभिये, निर्मला रंगारी, दिनदयाल दमाहे, अरुण कांबळे उपस्थित होते. संचालन नानाजी गजभिये यांनी तर आभार प्रदर्शन सुनिल नागदिवे यांनी केले.
गांधी चौक पालांदूर
पालांदूर : येथील गांधी चौकात सरपंच शुभांगी मदनकर यांच्या हस्ते महात्म गांधी यांच्या पुर्णाकृती पुतळयाचे पुजन करण्यात आले. यावेळी उपसरपंच ईश्वर तलमले, ग्रामपंचायत सदस्य, ग्रामविकास अधिकारी एच.एम. बावनकर, लिपीक राधेश्याम पाथोडे, शिपाई टिकाराम कावळे, वसंत बारई, शालिक बारई, सुरेश धकाते, सोविंदा भुसारी, महादेव खंडाईत, सुरेश तलमले, लहू नंदुरकर उपस्थित होते.
मऱ्हेगाव ग्रामपंचायत
पालांदूर : मऱ्हेगाव ग्रामपंचायत कार्यालात सरपंच शामा बेंदवार यांच्या हस्ते महात्मा गांधी व लालबहादूर शास्त्री यांची जयंती पार पडली. यावेळी उपसरपंच वाजन मदनकर, ग्रामसेवक एन.एन. रामटेके, ग्रामपंचायत सदस्य सिंधू थेर, फागोजी राऊ त, रवि राऊत उपस्थित होते.
जि.प.शाळा पालांदूर
पालांदूर : जिल्हा परिषद शाळा पालांदूर येथे महात्मा गांधी व लालबहादूर शास्त्री यांच्या जयंतीचा कार्यक्रम प्राचार्य, शिक्षक व विद्यार्थी यांच्या उपस्थितीत पार पडला. प्रा. युवराज खोब्रागडे यांनी गांधीजींच्या जीवनावर विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.
पटेल अध्यापक महाविद्यालय, भंडारा
भंडारा : मनोहरभाई पटेल अध्यापक महाविद्यालय भंडारा येथे महात्मा गांधी व लाल बहादूर शास्त्री यांची जयंती साजरी करण्यात आली. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्या डॉ. संगीता लोही (रोकडे) होते. यावेळी प्रा. कुकडे, प्रा. बिसेन, प्रा. नागपूरे, शिक्षकेत्तर कर्मचारी रवि शेडें, सीमा मेश्राम उपस्थित होते.
(लोकमत न्यूज नेटवर्क)

Web Title: Mahatma Gandhi-Shastriji respected

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.