महात्मा गांधी हे देशाचे भूषण
By Admin | Updated: January 25, 2015 23:09 IST2015-01-25T23:09:48+5:302015-01-25T23:09:48+5:30
महात्मा गांधीजींच्या एका पैलूवर एका दिवसाचे चर्चासत्र घेतले तरीही ते कमी पडतील. गांधीजींने जे देशासाठी केले ते आजन्म न विसरण्यासारखे आहे. प्रत्येक विद्यार्थ्यांनी गांधीजींचे गुण

महात्मा गांधी हे देशाचे भूषण
राष्ट्रीय चर्चासत्र : अशोक गोमासे यांचे प्रतिपादन
पालोरा/चौ. : महात्मा गांधीजींच्या एका पैलूवर एका दिवसाचे चर्चासत्र घेतले तरीही ते कमी पडतील. गांधीजींने जे देशासाठी केले ते आजन्म न विसरण्यासारखे आहे. प्रत्येक विद्यार्थ्यांनी गांधीजींचे गुण अंगीकारायला पाहिजे. गांधीजी हे देशाला लाभलेले एक भुषण होत, असे प्रतिपादन राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपुर विद्यापीठाचे कुलसचिव डॉ. अशोक गोमासे यांनी केले. डॉ. अरुण मोटघरे महाविद्यालय कोंढा कोसरा येथील एकदिवसीय राष्ट्रीय चर्चासत्रात ते बोलत होते.
हा कार्यक्रम महाविद्यालयाचे मराठी विभाग, इंग्रजी विभाग, समाजशास्त्र विभाग व इतिहास विभागाद्वारे आयोजित करण्यात आला होता. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी डॉ. अरुण मोटघरे होते. उद्घाटक म्हणून डॉ. अशोक गोमासे होते. प्रमुख पाहुणे म्हणून नागपूर विद्यापिठाचे डॉ. के.सी. देशमुख, डॉ. माधुरी नासरे, डॉ. माधव पात्रीकर उपस्थित होते. कार्यक्रमाप्रसंगी ‘मराठी साहित्यातील गांधीवाद’ यावर चर्चासत्र करण्यात आले. विज्ञान महाविद्यालय बार्शीटाकळी येथील मराठी विभाग प्रमुख प्रा. अनिल दडमल यांनी गांधीवादाने प्रभावित झालेले मराठी कादंबरी कविता, नाटक, कथा व गांधीजींचे आत्मचरीत्र यांचा आढावा घेण्यात आला. डॉ. माधव पात्रीकर व आर.एस. मुंडले यांनी गांधी थॉटस या विषयावर प्रबोधन केले. अशोक मोहरकर विद्यालयाचे प्रा. लालचंद रामटेके यांनी महात्मा गांधी यांच्या जीवनावर प्रकाशझोत टाकला.
माजी प्राचार्य डॉ. एम.एम. रामटेके यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालय ब्रह्मपुरी यांनी भारतीय स्वातंत्र्य लढ्यात गांधीजीच्या नेतृत्वाखाली महिलांचा सहभाग या विषयावर आढावा घेतला होता. डॉ. संजय पोहरकर यांनी गांधी विचार हा जगाला तारणारा आहे, असे विचार मांडले. संचालन प्रा. डॉ. अनिल बोपचे यांनी केले. प्रास्ताविक प्रा. डॉ. प्रशांत बुराडे यांनी तर आभार प्रदर्शन प्रा. कामराज रामटेके यांनी केले. (वार्ताहर)