पर्यटकांना खुणावतोय महास्तूप परिसर

By Admin | Updated: May 4, 2015 00:40 IST2015-05-04T00:40:09+5:302015-05-04T00:40:09+5:30

पञ्ञा मेत्ता संघ द्वारा निर्मित रुयाड (सिंदपुरी) येथील महासमाधी महास्तुप परिसरात भगवान गौतम बुद्ध यांच्या जीवनावर

The mahasupa campus is aiming for tourists | पर्यटकांना खुणावतोय महास्तूप परिसर

पर्यटकांना खुणावतोय महास्तूप परिसर

लक्ष्मीकांत तागडे  पवनी
पञ्ञा मेत्ता संघ द्वारा निर्मित रुयाड (सिंदपुरी) येथील महासमाधी महास्तुप परिसरात भगवान गौतम बुद्ध यांच्या जीवनावर साकारण्यात आलेले प्रसंग भेट देणाऱ्या पर्यटकांना शांती, समता, बंधुतेचा संदेश देण्यासोबतच अनेक ऐतिहासिक माहिती सांगून जातात. येथे बुद्ध पौर्णिमेनिमित्त हजारो उपासकांची गर्दी उसळणार आहे.
पञ्ञा मेत्ता संघ द्वारा रुयाड येथे तयार होत असलेल्या महास्तुपामुळे भंडारा जिल्हा जगाच्या नकाशावर आला आहे. या महास्तुपाचे काम आता अंतिम टप्प्यात आले आहे. या महास्तुपाचे काम लवकरच पूर्ण होणे अपेक्षित आहे. भदंत संघरत्न मानके यांच्या सहकार्याने तयार होत असलेला हा महास्तूप भारत - जपानच्या मैत्रीचे प्रतीक ठरत आहे. या महास्तुपाला भेट देण्याकरिता दररोज मोठ्या संख्येने पर्यटक येत आहेत. या महास्तूप परिसरात भगवान गौतम बुद्धांच्या जीवनावर आधारित मूर्तीच्या रुपात साकार करण्यात आलेले बोलके प्रसंग भेट देणाऱ्या पर्यटकांना खूप काही सांगून जातात.
या महास्तूप परिसरात प्रवेश करताच सर्वप्रथम घोड्यावर बसलेल्या राजकुमार सिद्धार्थला म्हातारा रस्त्याने जात असल्याचे व मृतदेह नेत असल्याचा प्रसंग साकार करण्यात आला आहे. हे प्रसंग पाहून राजकुमार सिद्धार्थ फार दु:खी होऊन आपले सर्व राजपाट सोडून ज्ञानप्राप्तीसाठी निघून जातो. नंतरच्या प्रसंगात भगवान बुद्धांना ज्ञानप्राप्ती झाल्यानंतर भूकेने व्याकुळ झालेल्या बुद्धाला सर्वप्रथम सुजाता दानपात्रात खिर देत आहे. हा प्रसंग प्रत्यक्षात साकारल्याचा अनुभव जाणवतो. पुढच्या प्रसंगात भगवान बुद्ध आपल्या शिष्यांना उपदेश करीत असल्याचे दर्शविण्यात आले आहे. पुढे उंच स्थानावर भगवान बुद्धांची ज्ञानतपस्या करतानाची अप्रतीमरित्या साकार करण्यात आली आहे. येथे ज्ञानतपस्वी भगवान बुद्धांची वाढलेली दाढी, अस्थिपंजर झालेले शरीप पाहून भेट देणारे पर्यटक भावूक होतात. येथे बुद्धांच्या शरीराचे अस्थिपंजर झालेले एक एक अवयव जीव ओतून दाखविण्यात आले आहे.
या महास्तूप परिसरातील भगवान बुद्धांच्या जीवनावरील प्रसंग पाहून पर्यटक स्वत:ला धन्य झाल्याचे मानतात. हा महास्तूप भारतात नाविण्य पूर्ण, अप्रतिम तर ठरला आहे. पण या स्तुपाच्या परिसरातील साकार करण्यात आलेले भगवान बुद्धांच्या जीवनावरील प्रसंगही तेवढेच अप्रतीम परिणामकारक ठरले आहे. हे प्रसंग पाहून पर्यटक भगवान बुद्धांचे पंचशिलाचे तत्व आपल्या जीवनातील आचरणात आणण्याचा प्रयत्न करतात. बुद्धांच्या जीवनावरील हे प्रसंग खूप काही सांगून जातात.

Web Title: The mahasupa campus is aiming for tourists

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.