शहरं
Join us  
Trending Stories
1
निवडणूक आयोग गायब नव्हता; लोकसभा निकालापूर्वी पत्रकार परिषद घेत आयुक्तांनी सुनावले
2
BREAKING Lipi Rastogi: आयएएस अधिकारी विकास रस्तोगींच्या मुलीची आत्महत्या, मंत्रालयासमोरच्या इमारतीत घडला प्रकार
3
महाराष्ट्रात आम्ही ३५ पेक्षा जास्त जागा जिंकणार; निकालाआधी विजय वडेट्टीवार यांचा मोठा दावा
4
अरुणाचल प्रदेशमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसला मोठे यश; अजित पवारांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
5
बहिणीला प्रियकरासोबत पाहताच संतापला भाऊ; वडिलांसह मिळून केली मुलाची निर्घृण हत्या
6
चर्चेतील 'या' हाॅट सीट्सवर बाजी मारणार तरी काेण ? कुठे लागू शकतात धक्कादायक निकाल?
7
भाजपाकडून विधान परिषदेसाठी तीन उमेदवार जाहीर, कोकण पदवीधरमध्ये निरंजन डावखरे तर...
8
सत्ताधाऱ्यांकडून मतमोजणीत फेरफार केला जाण्याची शक्यता, सतर्क राहा, जयंत पाटील यांचं कार्यकर्त्यांना पत्र
9
अमूलपाठोपाठ मदर डेअरीनेही दिला महागाईचा झटका; दुधाच्या दरात केली वाढ
10
पश्चिम रेल्वेपाठोपाठ मध्य रेल्वेचीही वाहतूक विस्कळीत, सीएसएमटी स्थानकात तांत्रिक बिघाड
11
एक्झिट पोलवर सोनिया गांधी यांची पहिली प्रतिक्रिया! जाणून घ्या, काय म्हणाल्या?
12
PHOTOS : शुबमन आणि रिद्धिमा लग्न करणार? अभिनेत्रीनं सोडलं मौन, तिचं धक्कादायक उत्तर
13
“अब की बार फिर मोदी सरकार”; भारतातील लोकसभा निवडणुकीच्या Exit Poll वर चीनची प्रतिक्रिया
14
PM Modi PSU Stocks : कोणी १०% वाढला... तर कोणी केला रकॉर्ड; PM Modiनी सांगितलेले शेअर्स बनले रॉकेट
15
महफिल फिरसे जमेगी! 'लाहोर नाही आता मुंबईत...' नेटफ्लिक्सने केली 'हीरामंडी 2' ची घोषणा
16
T20 World Cup 2024: क्रिकेटला पुन्हा ग्लॅमरचा तडका! आंतरराष्ट्रीय स्तरावर झळकली 'महाराष्ट्राची लेक'
17
एक्झिट पोलसारखेच वातावरण राहिले तर महाराष्ट्र विधानसभेला काय होणार? ठाकरेंची चारही बोटे तुपात...
18
Mumbai Local: मुंबईकरांची आठवड्याची सुरुवात लेटमार्कने! पश्चिम रेल्वे विस्कळीत, बोरीवलीत तांत्रिक बिघाड
19
शहाजीबापू पाटील ब्रीच कॅण्डी रुग्णालयात; CM एकनाथ शिंदेंनी घेतली भेट, केली तब्येतीची विचारपूस
20
Fact Check : राहुल गांधी पुढचे पंतप्रधान होतील असा दावा करणारी शाहरुख खानची 'ती' पोस्ट खोटी

महाशिवरात्र २०२४: एसटीला पावणार भोलेशंकर! शिवतिर्थांवरील यात्रांसाठी १२१ बसेसचे नियोजन

By युवराज गोमास | Published: March 05, 2024 8:37 PM

गतवर्षी २७,३७१ यात्रेकरूंच्या प्रवासातून एसटीने कमविले ९.२० लाख

युवराज गोमासे, भंडारा: लोकवाहिनी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या एसटी महामंडळाने यंदा महाशिवरात्री यात्रानिमित्ताने गायमुख, प्रतापगड, आंभोरा व लाखापाटील येथे जाणाऱ्या भाविकांसाठी १२१ विशेष बस गाड्यांचे नियोजन केले आहे. गतवर्षी ११४ बसेस यात्रेकरूंच्या सेवेत होत्या. २७ हजार ३७१ यात्रेकरूंच्या माध्यमातून एसटीने ९ लाख २० हजार ७५९ रूपयांची कमाई केली होती. यंदा वाढीव बसांच्या नियोजनामुळे शिवतिर्थांवर जाणाऱ्या भाविकांसह एसटीला भोलेनाथ पावणार, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.

भंडारा जिल्ह्यात अनेक शिवतिर्थांवर महाशिवरात्रीनिमित्त यात्रांचे व विविध कार्यक्रमांचे आयोजन पार पडतात. परंतु, गायमुख, आंभोरा, कोका अभयारण्यातील लाखा पाटील व गोंदिया जिल्ह्यातील प्रतापगड येथील यात्रा विशेष प्रसिद्ध आहेत. लाखो भाविक येथील यात्रेत सहभागी होतात. सध्या शहरांसह ग्रामीण भागातील शिवभक्तांचे पोहे विविध साधनांनी मार्गस्थ झाले आहे. ८ मार्चला महाशिवरात्रीला गंतव्यस्थळी पोहचण्याची धडपड भाविकांत आहे. मात्र, ज्यांचेकडे साधन नाहीत, ते एक दिवसाची यात्रा करण्यासाठी एसटीला पसंती देत असतात.

सन २०२३ मध्ये एसटी महामंडळाने गायमुख, प्रतापगड, आंभोरा व लाखापाटील येथील शिवतिर्थांवर जाणाऱ्या प्रवाशांच्या सुविधांसाठी ११४ बसांचे नियोजन केले होते. चारही शिवतिर्थांवर एकूण १९ हजार ४५३ किमीचा प्रवास एसटीने केला. सुमारे २७ हजार ३७१ यात्रेकरूंनी प्रवास केल्याने एसटीला ९ लाख २० हजार ७५९ रूपयांचे उत्पन्न मिळाले होते. एसटीला सर्वाधिक उत्पन्न गायमुख यात्रेतून मिळाले. त्यानंतरचा क्रम प्रतापगड यात्रेचा होता.बॉक्स

यंदा २११ बसेस धावणार शिवतिर्थांकडे

यावर्षी महाशिवरात्री यात्रेतून एसटी महामंडळाला अधिक उत्पन्न मिळविण्याची अपेक्षा आहे. त्यामुळे यंदा गतवर्षीपेक्षा अधिक म्हणजे १२१ बसांचे नियोजन करण्यात आले आहे. गायमुख यात्रेसाठी ५८, प्रतापगड ५७, आंभोरा ५ तर लाखापाटील यात्रेसाठी एका बसचे नियोजन करण्यात आले आहे.

गतवर्षी मिळालेले उत्पन्न व प्रवासी संख्या

गतवर्षी गायमुख यात्रेसाठी ५३ बसेसमधून १४,६१३ प्रवाशांनी केला. यातून सुमारे ४ लाख ४८ हजार १७९ रूपयांचे उत्पन्न मिळाले. प्रतापगड यात्रेसाठी ५३ बसेसमधून ११,०८५ प्रवाशांनी प्रवास केला. यामधून ४ लाख ६ हजार २३० रूपयांची कमाई झाली. आंभोरा यात्रेसाठी ७ बसेस धावल्या, १,४७७ यात्रेकरूंनी प्रवास केला. यातून ६१ हजार ७१५ रूपयांचे उत्पन्न मिळाले. लाखापाटील यात्रेसाठी एका धावली, १९३ यात्रेकरूंनी प्रवास केला. ४ हजार ६३५ रूपयांची कमाई झाली.

महाशिवरात्रीच्या चार यात्रांसाठी महामंडळाचेवतीने २११ विशेष बसांची सुविधा उपलब्ध होणार आहे. भाविकांनी सुरक्षित प्रवाशासाठी नेहमीप्रमाणे एसटीला प्राधान्य द्यावे.-तनुजा अहिरकर, विभागीय नियत्रक, भंडारा.

टॅग्स :Mahashivratriमहाशिवरात्रीstate transportएसटी