पालांदूर येथे महासमृद्धी महिला सक्षमीकरण अभियान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 17, 2021 04:35 AM2021-03-17T04:35:29+5:302021-03-17T04:35:29+5:30

प्रमुख पाहुणे म्हणून उमेद तालुका अभियान व्यवस्थापक सविता तिडके, मंडल कृषी अधिकारी गणपती पांडेगावकर, ग्रामविकास अधिकारी धनराज बावनकुळे, जिल्हा ...

Mahasamrudhi Women Empowerment Campaign at Palandur | पालांदूर येथे महासमृद्धी महिला सक्षमीकरण अभियान

पालांदूर येथे महासमृद्धी महिला सक्षमीकरण अभियान

Next

प्रमुख पाहुणे म्हणून उमेद तालुका अभियान व्यवस्थापक सविता तिडके, मंडल कृषी अधिकारी गणपती पांडेगावकर, ग्रामविकास अधिकारी धनराज बावनकुळे, जिल्हा परिषदेचे माजी सदस्य बिंदू कोचे, तालुका व्यवस्थापक उमेश ऊके, प्रभाग समन्वयक निखील जुमळे, डॉ. डहाळे, डॉ. प्रशांत फुलझले, जिल्हा बँक शाखा निरीक्षक यादव सोनकुसरे, ग्रामीण बँक शाखा व्यवस्थापक दाहट, ग्राम सुरक्षा महिला संघाच्या अध्यक्ष सुनीता काटेखाये उपस्थित होते. प्रभाग संघ स्थापन करून त्यांची क्षमता तयार करणे व ग्रामीण भागातील बेरोजगार युवक - युवतींना रोजगार व स्वयंरोजगाराच्या संधी उपलब्ध करून देणे, यावर भर देण्यात आलेला आहे. दुसऱ्या टप्प्यात महिलांना अन्न, पोषण, आरोग्य, आहार, सामाजिक व सांस्कृतिक उपक्रम विविध योजनांतर्गत व्यक्तिगत लाभाच्या योजनाअंतर्गत सक्षम करण्याचे धोरण आखलेले आहे. प्रास्तविक निखील जुमळे यांनी केले. संचालन चंद्रकला राजेंद्र जनबंधू यांनी केले. सुनीता काटेखाये यांनी आभार मानले.

Web Title: Mahasamrudhi Women Empowerment Campaign at Palandur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.