Maharashtra Election 2019 ; पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या सभेची उत्सुकता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 13, 2019 06:00 AM2019-10-13T06:00:00+5:302019-10-13T06:01:03+5:30

शनिवारपासूनच साकोली शहराला छावणीचे रुप आले आहे. चौकाचौकात पोलीस तैनात करण्यात आले आहेत. चार दिवस राबून सभास्थळी मंडप उभारण्यात आला आहे. या सभास्थळाजवळ हेलीपॅड तयार करण्यात आले आहे. पंतप्रधान मोदी जळगाव जिल्ह्यातील सभा आटोपून विमानाने गोंदिया आणि तेथून हेलीकॉप्टरने साकोली येथे येणार असल्याची माहिती खासदार सुनील मेंढे यांनी दिली.

Maharashtra Election 2019 ; Looking forward to the meeting of Prime Minister Narendra Modi? | Maharashtra Election 2019 ; पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या सभेची उत्सुकता

Maharashtra Election 2019 ; पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या सभेची उत्सुकता

Next
ठळक मुद्देभाषणाकडे लक्ष । महायुतीच्या उमेदवारांसाठी आज साकोलीत सभा

लोकमत न्यूज नेटवर्क
साकोली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची रविवारी साकोली येथे महायुतीच्या उमेदवारांसाठी जाहीर सभा होत असून या सभेची उत्सूकता जिल्ह्याला लागली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आपल्या भाषणात काय बोलतात, याकडेही सर्वांचे लक्ष लागले आहे. दरम्यान प्रशासनाने सभेची जय्यत तयारी केली असून साकोलीला पोलीस छावणीचे रुप आले आहे.
भंडारा व गोंदिया जिल्ह्यातील सात विधानसभा मतदार संघातील भाजप-शिवसेना महायुतीच्या प्रचाराकडे रविवार १३ आॅक्टोबर रोजी दुपारी ३ वाजता साकोली येथील शासकीय तंत्रनिकेतन विद्यालयासमोरील प्रांगणात सभा होत आहे. देशाच्या पंतप्रधानाची साकोलीत होणारी ही पहिलीच सभा आहे. त्यामुळे सर्वांना मोठी उत्सूकता लागली आहे.
सरकारवर आरोप करीत आणि भाजप खासदारकीचा राजीनामा देणारे नाना पटोले या मतदारसंघात आघाडीचे उमेदवार आहेत. त्यामुळे पंतप्रधान मोदी आपल्या भाषणातून त्यांचा कसा समाचार घेतात याकडेही सर्वांचे लक्ष आहे.
साकोली येथे पंतप्रधानांची सभा होत असल्याने प्रशासनाने तगडा बंदोबस्त लावला आहे.
शनिवारपासूनच साकोली शहराला छावणीचे रुप आले आहे. चौकाचौकात पोलीस तैनात करण्यात आले आहेत. चार दिवस राबून सभास्थळी मंडप उभारण्यात आला आहे. या सभास्थळाजवळ हेलीपॅड तयार करण्यात आले आहे. पंतप्रधान मोदी जळगाव जिल्ह्यातील सभा आटोपून विमानाने गोंदिया आणि तेथून हेलीकॉप्टरने साकोली येथे येणार असल्याची माहिती खासदार सुनील मेंढे यांनी दिली.
या सभेला भंडारा, गोंदिया, नागपूर, चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्यातील नागरिक येणार आहेत. या सभेला रिपाइंचे नेते केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांच्यासह भाजपचे ज्येष्ठ नेते आणि भंडारा गोंदिया जिल्ह्यातील सातही मतदार संघातील महायुतीचे उमेदवार उपस्थित राहणार आहेत.

समीकरण बदलणार
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सभेनंतर भंडारा आणि गोंदिया जिल्ह्यातील निवडणुकीचे समीकरण बदलणार अशी चर्चा जिल्हाभर दिसत आहे. साकोली येथून भाजप -शिवसेना युतीचे डॉ.परिणय फुके निवडणूक रिंगणात आहेत. विदर्भातील पंतप्रधानांची पहिली सभा साकोलीत होत आहे. त्यामुळे साकोली मतदारसंघाला वेगळे महत्व प्राप्त झाले आहे.

चौकाचौकात पोलीस
पंतप्र्नधान नरेंद्र मोदी यांच्या सभेनिमित्त साकोली शहरात चौकाचौकात शनिवारपासून पोलीस तैनात करण्यात आले आहेत. प्रशासनाने या सभेची जय्यत तयारी केली आहे. सभास्थळीही चोख बंदोबस्त राहणार असून वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी शनिवारी सभास्थळाची पाहणी करून सुरक्षेचा आढावा घेतला. रविवारी होणारी गर्दी लक्षात घेता वाहनांसाठी पार्किंगची व्यवस्था साकोली शहरात करण्यात आली. सभास्थळापासून जवळपास तीन किलोमीटर दूर पार्किंग आहे. साकोलीत पंतप्रधान नरेंद्र मोदी पहिल्यांदाच सभेच्या निमित्ताने येत असल्याने नागरिकांमध्ये प्रचंड उत्सुकता दिसत आहे.

Web Title: Maharashtra Election 2019 ; Looking forward to the meeting of Prime Minister Narendra Modi?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.