महाराणा प्रतापांचे कार्य प्रेरणादायी
By Admin | Updated: May 23, 2015 01:15 IST2015-05-23T01:15:49+5:302015-05-23T01:15:49+5:30
महिलांनी चार भितींच्या बाहेर निघून कालानुरूप एकमेकांच्या खांद्याला खांदा मिळवून चालावे.

महाराणा प्रतापांचे कार्य प्रेरणादायी
भंडारा : महिलांनी चार भितींच्या बाहेर निघून कालानुरूप एकमेकांच्या खांद्याला खांदा मिळवून चालावे. बचत गटाच्या माध्यमातून आर्थिक प्रगती साधून कुटुंबाच्या खर्चात आर्थिक हातभार लावावा. जेणेकरून कुटुंब आणि समाजाचा नाव उज्वल होईल. महाराणा प्रताप यांच्या विचारांवर चालण्याची गरज निर्माण झाली असून त्यांचे बलिदान जगासाठी प्रेरणादायी आहे, असे प्रतिपादन अखिल भारतीय क्षत्रिय महासभा महाराष्ट्र महिला प्रदेशाध्यक्षा प्रतिभा राणा यांनी व्यक्त केले.
भंडारा शहरातील देशबंधू वार्डात बुधवारी आयोजित महाराणा प्रताप जयंती कार्यक्रमात त्या बोलत होत्या. प्रतिभा राणा म्हणाल्या, महाराणा प्रताप यांचे विचार जगासाठी प्रेरणादायी आहेत. पन्नाची युक्ती, मीराची भक्ती, भामाशाह यांची संपत्ती व महाराणा प्रताप यांची शक्ती ही देशाचा देशाचा मान वाढविणारी आहे. त्यांच्या बलिदानाला विसरणे शक्य नसून ते संपूर्ण देशाचे गौरव आहेत.
अखिल भारतीय क्षत्रीय महासभा प्रदेश कार्यकारणी, महाराणा प्रताप महिला बचत गट, महाराणा प्रताप युवा मंच याच्या संयुक्त विद्यमाने महाराणा प्रताप यांची ४७५ वी जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. कार्यक्रमाला नगरसेवक किरण व्यवहारे, इंजि.चव्हाण, सुधा बैस, ललितसिंह बाच्छिल, लीना चव्हाण, गायत्री कछवाह, अर्चना बाच्छील आदी उपस्थित होते.
या प्रसंगी भजन संध्या, संगीत खुर्ची, रांगोळी स्पर्धा अंताक्षरी आदीचे आयोजन करण्यात आले.
कार्यक्रमाचे संचालन स्वाती गहेरवार व आभार रुपा चंदेल यांनी मानले. कार्यक्रमकरिता सचिन गहेरवार, गौरव बाच्छील, जगदीशसिंह चव्हाण, विक्की बाच्छील, मनिषा शक्करवार, उदयसिंह बाच्छील, नरेंद्र भुवाल, वामन गाते, मुस्कान बाच्छील, रजनी ठाकूर, हरदीपसिंह बाच्छील, धनंजय शक्करवार आदींनी सहकार्य केले.
जिल्हा परिषदेत जयंती उत्सव
भंडारा : जिल्हा परिषद भंडारा येथे महाराणा प्रताप यांच्या जयंतीनिमित्त कार्यक्रम आयोजित करण्यात आला. अध्यक्षस्थानी मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल द्विवेदी होते. यावेळी महाराणा प्रताप यांच्या जीवनकार्याबद्दल शिक्षणाधिकारी ए. वा. मडावी म्हणाले, महाराणा प्रताप एक महान देशभक्त होते. त्यांचे नाव स्वर्ण अक्षरात लिहले गेले आहे. आपल्या युगाचे एक महान व्यक्ती होते. त्यांना स्त्रियाविषयी आदर होता. छापामार युध्द पध्दतीने त्यांनी ३० वर्षे अकबराला पेचात पाडले होते व शेवटपर्यंत अकबराला शरण गेले नाही. त्यांचे गुण कर्मचाऱ्यांनी आत्मसात करावे. संचालन उपमुख्य कार्यकारी अधिकारी सुधीर वाळके यांनी मानले. कार्यक्रमाला जिल्हा परिषदेतील सर्व विभागप्रमुख उपस्थित होते. (नगर प्रतिनिधी)