‘मॅग्मो’ने उपसले आंदोलनाचे हत्यार
By Admin | Updated: May 27, 2014 23:28 IST2014-05-27T23:28:29+5:302014-05-27T23:28:29+5:30
वैद्यकीय अधिकारी यांच्या प्रलंबित मागण्यांसंदर्भात महाराष्ट्र राज्य राजपत्रित वैद्यकीय अधिकारी संघटनेने मॅग्मो आंदोलनाचे हत्यार पुन्हा उपसले आहे. त्याअंतर्गत आज मंगळवारी सकाळी १0 वाजता

‘मॅग्मो’ने उपसले आंदोलनाचे हत्यार
रुग्णांची होणार वाताहत : २ जूनपासून कामबंद आंदोलन भंडारा : वैद्यकीय अधिकारी यांच्या प्रलंबित मागण्यांसंदर्भात महाराष्ट्र राज्य राजपत्रित वैद्यकीय अधिकारी संघटनेने मॅग्मो आंदोलनाचे हत्यार पुन्हा उपसले आहे. त्याअंतर्गत आज मंगळवारी सकाळी १0 वाजता काळी फित लावून मूक मोर्चा काढण्यात आला. मोर्चाचे समारोप जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात करण्यात आले. सार्वजनिक आरोग्य विभागातील जवळपास १२ हजार वैद्यकीय अधिकारी व वरिष्ठ आरोग्य अधिकारी यांची शिखर संघटना मॅग्मो आहे. महाराष्ट्रातील जवळपास ८0 टक्के जनतेला आरोग्य सुविधा पुरविणार्या व ग्रामीण भागामध्ये कार्यरत असणार्या या अशा वैद्यकीय अधिकार्यांकडे काही कारणाने शासनाचे सातत्याने दुर्लक्ष होत असून त्यांचे अनेक न्याय्य प्रश्न प्रदीर्घ काळापासून प्रलंबित राहिलेले आहेत. वैद्यकीय अधिकारी प्राथमिक आरोग्य केंद्र, ग्रामीण रुग्णालय, उपजिल्हा रुग्णालय, जिल्हा रुग्णालय येथे कार्यरत आहेत. सार्वजनिक आरोग्य विभाग मधील वैद्यकीय अधिकार्यांच्या अत्यंत महत्वाच्या व जिव्हाळ्याच्या प्रश्नासंदर्भात शासनाचे नेहमीच उदासीन धोरण राहिले आहे. त्यामुळे डॉक्टर्स शासकीय सेवेकडे आकर्षित होत नाहीत. मागील ३ वर्षात मुख्यमंत्र्यांसहीत, उपमुख्यमंत्री, आरोग्य मंत्री, अपर मुख्य सचिव सार्वजनिक आरोग्य विभाग या प्रमुख मान्यवरांनी यापूर्वीच मॅग्मो संघटनेच्या सर्वच जिव्हाळ्यांच्या मागण्यांची अंमलबजावणी तात्काळ करू, असे अभिवचन मॅग्मो संघटनेस या सर्व मान्यवरांनी दिले होते. यात सन २00९-१0 मध्ये सेवा समावेशन झालेल्या वैद्यकीय अधिकारी यांना पुर्वलक्ष लाभ द्यावा, अस्थायी जवळपस ७८९ बीएएमएस वैद्यकीय अधिकारी गट ब व अस्थायी जवळपास ३२ बीडीएस वैद्यकीय अधिकारी गट ब यांचे सेवा समावेश करावा, १ जानेवारी २00६ पासून राज्यातील सर्वच वैद्यकीय अधिकार्यांना ६ वा वेतन आयोग लागू करावा, राज्यातील सर्वच वैद्यकीय अधिकारी व वरिष्ठ आरोग्य अधिकार्यांना केंद्रशासन व वैद्यकीय शिक्षण विभागाप्रमाणे उच्च वेतन देण्यात यावे, आदी ११ मागण्यांचा समावेश आहे. मागण्यांची पुर्तता न झाल्याने वैद्यकीय अधिकार्यांनी आंदोलनाचे बंड पुकारले आहे. यात दि.२८ मे पासून सर्व बैठकांवर बहिष्कार घालणे, दि.३१ मेपासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे देणे तर दि.२ जूनपासून राज्यव्यापी कामबंद आंदोलन करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे राज्यातील सर्वच आरोग्यसेवा ठप्प पडणार आहे. यावर लवकर तोडगा न निघाल्यास रुग्णांचे हाल होण्यास वेळ लागणार नाही. दुसरीकडे मॅग्मोच्या पदाधिकार्यांनी आंदोलनात सहभागी व्हावे, असे संघटनेचे जिल्हाध्यक्ष डॉ. मधुकर कुंभरे, डॉ.दिनेश कुथे, डॉ.चंचल खोब्रागडे, डॉ.अरुण नडंगे, डॉ.पंकज येवले यांनी कळविले आहे. (शहर प्रतिनिधी)